सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व वातावरणात उजनी धरण परिसरात आल्हाददायक अनुभव; परतीच्या प्रवासासाठी फ्लेमिंगो एकवटले!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मान्सूनपूर्व वातावरणात उजनी धरण परिसरात आल्हाददायक अनुभव; परतीच्या प्रवासासाठी फ्लेमिंगो एकवटले!

केतूर(अभय माने) ; परदेशी आणि परप्रांतातील पक्ष्यांच्या थव्यांनी पळसदेव (या. इंदापूर) येथील उजनी जलाशयाची काठ बहरून आला आहे. पळसदेव व काळेवाडी परिसरातील विस्तृत हिरव्या गालिच्यावर नजाकतदार रेहित (फ्लेमिंगो) सह विविध प्रकारचे देशी विदेशी पक्षी विहारताना मनमोहक दृश्य पक्षी निरीक्षक व निसर्ग भ्रमण करणाऱ्यांना भुरळ घालत आहे.
तापमान वाढीमुळे होणारे बाष्पीभवन, नदी व कालव्यातून सुरू असलेल्या विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेले बेसुमार पाणी उपसा यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने खालावत चालली आहे.

त्यामुळे पळसदेव परिसरातील पाणीपातळीला कमालीची ओहोटी लागली आहे. धरणाचे निर्मितीनंतर येथील नदी काठावरील मंदिराला जलसमाधी मिळाली आहे; मात्र या दिवसात पाणी ओसरू लागले की हे मंदिर उघडे होऊ लागते.

आता बुडालेले या मंदिराचे निम्म्याहून अधिक भाग दिसत असली तरी मंदिर पाण्यात खूप दूरवर आहे. या मंदिराच्या सभोवताल भागातील दलदल, चिखल आणि पाण्यातील खांद्यावर ताव मारण्यासाठी रोहित पक्ष्यांने मोठी गर्दी केली आहे. रोहित पक्ष्यांचे थवे या परिसरात सध्या वास्तव्याला आहेत.

या पक्षांचे उघडेचोच, चित्रबलाक, शेकाट्या, पाणटिवाळे, काळे व पांढरे कुदळे व स्थानिक बदकांचे थवे या परिसरात मनसोक्त विहार करताना दिसत आहेत. गुलाबी रंगाचे पाय पिवळ्या रंगाची चोच आणि गुलाबी छटा असलेली पांढऱ्या पंखांच्या रोहित पक्ष्यांची लांबलचक रांग पाहिल्यावर अनुभवाला येणारे नेत्रसुख काही वेगळेच असते.

सायंकाळी वाऱ्याचे झोताने तयार होणाऱ्या लाटांची गाज काठावर साद घालत असते. विस्तीर्ण जलाशय वरून येणारा गार वारा व मावळतीच्या सूर्याची किरणे या परिसरात पडल्यावर नजरेस पडणारे दृश्य विलोभनीय वाटते. अस्ताला निघालेल्या सूर्याला साक्षी ठेवून लालभडक अग्निपंखी रोहितांचे थवे आकाशात झेप घेताना नेमके वर्णन करणे खूप कठीण आहे.

धरणक्षेत्रतील अन्यत्र ठिकाण्याहून रोहित पक्षी जरी पळसदेव परिसरात एकवटले असले तरीही कोंडारचिंचोळी, टाकळी, डिकसळ,केतूर, कुगाव, वाशिंबे आदी ठिकाणच्या विस्तृत पाणपृषठावर काही प्रमाणात अद्याप आढळत आहेत.

साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये धरणातील पाणी पातळी खालावते त्यानंतर दलदल असलेल्या भागात पक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर चराऊ क्षेत्र उपलब्ध होते या ठिकाणच्या खाद्यांवर उदरनिर्वाह करण्यासाठी विविध प्रजातीचे पक्षी मोठ्या संख्येने तिथे येतात. त्यामुळे तिथे पक्ष्यांचा वावर वाढलेला असतो. पुढील पंधरा दिवसांत हे पक्षी आपल्या मूळस्थानाकडे परतण्यासाठी उड्डाण घेतील असा अंदाज आहे.”
__ . अरविंद कुंभार ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक.

litsbros

Comment here