करमाळा

दीड वर्षानंतर आता पुन्हा गजबजली मंगल कार्यालय; घुमू लागले सनई चौघड्याचे मंगल सूर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दीड वर्षानंतर आता पुन्हा गजबजली मंगल कार्यालय; घुमू लागले सनई चौघड्याचे मंगल सूर

केतूर ता. 3 कोरोना महामारी मुळे मार्च 2020 पासून बंद असलेली मंगल कार्यालय तब्बल दीड वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा नव्या जोमात उत्साहात सुरू झाल्याने लग्नसमारंभ पूर्वीप्रमाणे थाटामाटात होऊ लागल्याचे चित्र आहे. त्यातच डिसेंबर 21 मध्ये लग्न मुहूर्त मोठ्या प्रमाणावर असल्याने रस्त्यावरही वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीची कोंडी ही होऊ लागली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंगल कार्यालय शासनाकडून बंद करण्यात आली होती तेव्हा पासून ती ओस पडली होती त्यामुळे मंगल कार्यालय चालक व त्यावर अवलंबून असणारे केटर्स , फूलवाले ,बँड ,डॉल्बी सिस्टीम , ब्राह्मण , घोडेवाले ,फोटोग्राफर यासह इतर व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले होते,


परंतु कोरोनाचे संकट कमी झाल्याने आता मंगलकार्यालय पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहेत परंपरे नुसार तुलसीविवाह संपल्यानंतर लग्नतिथी सुरू झाल्याने सध्या लग्न सोहळे धूमधडाक्यात सुरू झाले आहेत.

दरम्यान कोरोनाचा नवा अवतार ओमिक्रोन आल्याने आता काय होणार ? या काळजीने सर्वांचेच काळजाचा ठेका चुकला असून सर्व जण चिंताग्रस्त झाले आहेत.

छायाचित्र : दीड वर्षाच्या कालावधीनंतर गजबजलेली मंगल कार्यालय
(छायाचित्र : अभय माने, केतूर)

litsbros

Comment here