ऐन उन्हाळ्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यांत कोसळणार पावसाच्या सरी? वाचा सविस्तर
सध्या कडाक्याच्या उन्हाने सर्वांनाच हैराण केलं आहे. पण अशात 21 ते 23 एप्रिलपर्यंत जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. तसेच 21- 23 April काही ठिकाणी हलका पाऊस किंवा वीजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. असे ट्विट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी केले आहे. त्यामुळे अनेक फळबागा उत्पादकांची चिंता वाढली आहे. राज्यात सध्या कडाक्यााचे उन पडत आहे. काही जिल्ह्याचा पारा हा अजूनही चाळीस डिग्रीच्या पुढे आहे. अशात पावसाचा इशारा मिळाल्याने आता शेतकऱ्यांची चिंता चांगलीत वाढली आहे. हातातोंडाला आलेही पिकं पुन्हा मातीसोल होण्याची भिती बळीराजाला लागली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये 21 आणि 22 तारखेला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ज्या जिल्ह्यात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामध्ये बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत सध्या जास्त वाढ झालीआहे. राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात वेगळ्या ठिकाणी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण हवामानावर त्याचा मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोनाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेकदा सततच्या लॉकडाऊनमुळे शतमाल हा शेतात सडून गेला आहे. यंदा सर्व सुरळीत होत असताना चार पैसे शेतकऱ्याच्या खिशात उरतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, मात्र पावसामुळे पुन्हा पिकं वाया जाण्याची भिती आता बळीराजाला अस्वस्थ करत आहे. आधीही अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. आता अनेक फळबागा तोडणीला आलेल्या आहेत. या फळबागाला शेतकऱ्यांनी कर्ज काढून मोठा खर्च केला आहे. ते कर्ज फेडण्याचे आव्हान आता शेतकऱ्यांसमोर असणार आहे.
Comment here