Uncategorized

रशिया-युक्रेन युद्धाचा भडका: पण आपल्याकडे महागाई तेजीत, ‘या’ वस्तूंचे दर आणखी वाढण्याची शक्यता

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रशिया-युक्रेन युद्धाचा भडका: पण आपल्याकडे महागाई तेजीत, ‘या’ वस्तूंचे दर आणखी वाढण्याची शक्यता

केतूर (अभय माने): गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खाद्यतेल याबरोबरच पेट्रोल-डिझेल तसेच गॅसच्या किमतीत मोठी वाढ होत आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र झळ बसत आहे.

रशिया व युक्रेन देशाच्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.देशातील पाच राज्यातील निवडणुका संपताच हा भडका उडेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

गेल्या वर्षभरापासून खाद्यपदार्थाच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. सध्या रशिया युक्रेन यांच्या युद्धाचा भडका उडाला आहे. देशात येणारे खनिजतेल या देशातून मोठ्या प्रमाणावर येते. हे युद्ध आणखी लांबल्यास तेलाची आयात लांबण्याची शक्यता आहे.

तर ब्रिटनने आपले गॅसचे शेअर्स ही परत घेतल्याने आगामी काळात इंधना बरोबरच गॅसचे दरही वाढणार आहेत. या युद्धाचा अशाप्रकारे भारतीयांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

litsbros

Comment here