महाराष्ट्र

40 एकरातील ऊसाला आग, …तर टळली असती दुर्घटना

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

40 एकरातील ऊसाला आग, …तर टळली असती दुर्घटना

ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी बीड, लातूर, औरंगाबाद जिल्ह्यात अशा घटना समोर आल्या आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अनेक ठिकाणी वेळेत तोड झाली नाही. त्यामुळे कालावधी पूर्ण होऊनही ऊस फडातच आहे. धुळे जिल्ह्यातील जुने कोडदे शिवारातील ऊसाची वेळेत तोड झाली असती तर 40 एकरातील ऊस जळून खाक झालाच नसता.

दोंडाईचा येथील जुने कोळदे येथे उसाच्या क्षेत्राला चाळीस ते पन्नास एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. गावातील तरुण व दोंडाईचा अग्निशामक दलाची गाडी तात्काळ पोहोचल्याने आग आटोक्यात आणली मात्र, नुकसान टाळता आले नाही.
40 एकरातील ऊस जळून खाक जुने कोडदे गाव शिवारातील ऊसाला अचानक सोमवारी सकाळी आग लागली. सध्या ऊस तोडणीला आला असल्याने ऊसाचे पाचरट हे वाळलेले आहे. त्यामुळे काही क्षणात आगीने 40 एकरातील ऊस कवेत घेतला. शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.


ऊसतोडीचा कालावधी संपला होता: लागवड केल्यापासून 12 महिन्यांनी ऊसाचे गाळप होणे गरजेचे आहे. यंदा ऊस गाळपात वाढ झाली असली तरी वाढीव क्षेत्रामुळे अजूनही ऊस फडातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. वेळेत ऊसाची तोड झाली असती तर दोंडाईचा येथील जुने कोळदे शिवारात हे नुकसान झाले नसते.


शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ : सकाळच्या प्रहरीच आग लागल्याने काही वेळेतच शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग आटोक्याचा सर्वकश प्रयत्न केले मात्र, वारे आणि वाळलेले पाचट यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रयत्न हे निष्फळ ठरले.


अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी : गावातील तरुण व दोंडाईचा अग्निशामक दलाची गाडी तात्काळ पोहोचल्याने आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील दुर्घटना टळली मात्र, आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजलेले नाही. ऊसाबरोबरच इतर शेतीचे नुकसान झाले आहे.

litsbros

Comment here