ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरोनामुळे लग्न रद्द झालं? मिळणार तब्बल 10 लाख रुपये, जाणून घ्या कसे?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोनामुळे लग्न रद्द झालं? मिळणार तब्बल 10 लाख रुपये, जाणून घ्या कसे?

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरात धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. दिवसागणिक या घातक व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहे. अगदी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करावा लागणार अशी वेळ आली आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात तडाखा सहन केलेल्या नागरिकांच्या मनात आता भिती निर्माण झाली आहे. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आल्याचे संकेत देखील महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने दिले आहे.

अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता महाराष्ट्रात लग्न समारंभ तसेच धार्मिक कार्यक्रमावर निर्बंध लादण्यात आले आहे. लग्न समारंभाला आता फक्त 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी असणार आहे. तर अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. इतर कोणत्याही कार्यक्रमात 20 हून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे.
दरम्यान, राज्य सरकारने नवी नियमावली जारी केल्यानंतर आता जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लग्नाचं बुकिंग केलेल्या लोकांच्या टेंशनमध्ये वाढ झाली आहे. अनेकांनी तर आपलं लग्न देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला देखील असा निर्णय घ्यावा तर अजिबात घाबरून जाण्याची गरज नाहीये. कारण जर तुम्ही तुमचं लग्न रद्द केलं तर तुम्हाला 10 लाख रुपयाचा फायदा होणार आहे. महत्वाचं म्हणजे तुमचा यासाठी एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाहीये.


कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव पाहता, नवीन नियमांमुळे ऐनवेळी अनेकांना लग्नाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागतात. अशा परिस्थितीत अनेकदा लग्नासाठी बुकींग केलेले हॉल, लॉन्स, केटरिंग, डेकोरेशनचे पैसे परत करण्यास व्यावसायिक नकार देतात. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशातील अनेक कंपन्या तुम्हाला लग्नाचा विमा देतात. तुमचं लग्न रद्द झाल्यापासून ते अगदी दागिने चोरी जाईपर्यंत हा विमा काम करतो.

कसा मिळणार लाभ?
जर तुम्ही लग्नाचं इन्श्युरन्स काढलं असेल तर तुमचं नुकसान होणार नाही. इन्श्युरन्स कंपनी सुरूवातीपासून पॅकेज तयार करून ठेवते. तर अनेक कंपन्या गरजेनुसार पॅकेज तयार करतात.

कोणत्या गोष्टींवर मिळणार इन्श्युरन्स

कॅटररला दिलेल्या आगाऊ रक्कमेवर
बुक केलेल्या कोणत्याही हॉल किंवा रिसॉर्टला दिलेले आगाऊ रक्कम
ट्रॅव्हल्स एजन्सीला दिलेली आगाऊ रक्कम
लग्नाच्या पत्रिकेकरता झालेला खर्च
डेकोरेशनकरता दिलेले आगाऊ पैसे
लग्नाच्या वेन्यूसेटवर आगाऊ पैसे
इन्श्युरन्स मिळण्याची पद्धत –

इन्श्युरन्स घेण्यापूर्वी, तुम्हाला लग्नाच्या खर्चाची सर्व माहिती विमा एजन्सीला द्यावी लागेल.
तुमचे नुकसान होताच लगेच तुमच्या विमा कंपनीला कळवा.


यानंतर, जर तुमची कोणतीही वस्तू चोरीला गेली असेल, तर त्याची माहिती पोलिसांना द्या आणि एफआयआरची प्रत विमा कंपनीकडे द्या.
दावा करण्यासाठी फॉर्म भरा, कंपनीसोबत सर्व कागदपत्रे जमा करा.
तुमची विमा कंपनी तपासासाठी प्रतिनिधी पाठवून सर्व माहिती घेईल, त्यानंतरच दावा केलेले पैसे परत केले जातील.
जर तुम्ही केलेला दावा खरा ठरला, तर विमा कंपनी नुकसानीची पूर्ण भरपाई करेल.
दाखल केलेला दावा खोटा ठरल्यास, दावा नाकारला जाईल.
विमा कंपनी ही रक्कम थेट लग्नाच्या ठिकाणी किंवा विक्रेत्याला देऊ शकते.
जर कोणत्याही प्रकारे पॉलिसीधारक दावा केलेल्या रकमेवर खूश नसेल, तर तो थेट न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडू शकतो.
कोणत्याही परिस्थितीत, विवाह विम्याचा दावा अपघातानंतर 30 दिवसांच्या आत निकाली काढला जातो.

litsbros

Comment here