उत्तरेश्वर युवा परिवर्तन ग्रुपच्या वतीने करमाळा तालुक्यातील ‘या’ पत्रकारांचा झाला सन्मान

उत्तरेश्वर युवा परिवर्तन ग्रुपच्या वतीने करमाळा तालुक्यातील ‘या’ पत्रकारांचा झाला सन्मान  

केम (प्रतिनिधी);

 श्री उत्तरेश्वर युवा परिवर्तन केम यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी व्यासपीठावर ए,पी, ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दौड, पै महावीर तळेकर, विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन बाळासाहेब देवकर, माजी चेअरमन आनंद शिंदे माजी संचालक गोरख जगदाळे, संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष नितीन खटके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्ता गवळी,प्रहार संघटनेचे संदिप तळेकर शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष परमेश्वर तळेकर, युवा सेनेचे समन्वयक सागर राजे तळेकर,महेश तळेकर, बापू नेते तळेकर, शिवाजी मोळीक,

केम पोलिस चौकिचे पोलीस उपनिरीक्षक जाधवर साहेब आजीनाथ लोकरे पांडुरंग तळेकर रमेश तळेकर अन्वर मुलाणी शिवसेनेचे सतीश खानट , दादा साहेब गोडसे विष्णू पारखे राजु कोंडलकर, विजयसिंह ओहोळ, योगेश ओहोळ, दत्ता बिचितकर सागर कुरडे,योगेश ओहोळ भाजपाचे धनंजय ताकमोगे,सचिन रणश्रृंगारे सौ आशा मोरे माजी सैनिक मोरे आदी उपस्थित होते या वेळी पत्रकार,विशाल घोलप, अशोक मुरूमकर, शंभुराजे फरतडे,,किशोर शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले पत्रकारांनी जनतेचा एखादा जिव्हाळ्याचा प्रश्न हाती घेतल्यास त्याला जनतेचे पाठबळ लागते नुसत्या बातम्या नी प्रश्न सुटत नाही त्यासाठी चळवळीची गरज आहे.   

 करमाळा,जेउर,मांगी,केतुर येथील आमदार झाले पण करमाळा तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या केम गावात तील आमदार झाला नाही आता येथील तालुक्याचे नेतृत्व करायला पुढे आले पाहिजे त्याला करमाळा तालुक्यातील सर्व पत्रकाराचा पाठिंबा राहिले असा विश्वास या वेळी पत्रकारांनी दिला.  

या वेळी पत्रकार, अश्फाक सय्यद, दिनेश मडके, बाळासाहेब,सरडे, विजय निकत, सिध्दार्थ वाघमारे, सागर गायकवाड, सुयोग झोळ, विशाल परदेशी, गणेश जगताप,शितल मोटे, राहुल रामदासी, संजय जाधव,सचिन बिचितकर, धर्मराज दळवे, दिपक काकडे,संतोष देवकर हर्षवर्धन गाडे, ,अलीम शेख, प्रविण मखरे,, आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार यानी केले.

तर आभार संदिप तळेकर अच्युत काका पाटील यांनी मानले केम येथे प्रथमच करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला या बद्दल श्री ऊत्तरेश्वर युवा ग्रुपचे केम परिसरातून कौतुक केले जात आहे.

karmalamadhanews24: