तिळगुळ घ्या … गोड गोड बोला….मकर संक्रात उत्साहात साजरी

तिळगुळ घ्या … गोड गोड बोला….मकर संक्रात उत्साहात साजरी


केत्तूर ( अभय माने) : केत्तूर व परिसरात तसेच संपूर्ण करमाळा तालुक्यात मकर संक्रांतीचा सण दुष्काळी परिस्थिती असतानाही पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत शुभेच्छा दिल्या येथील विठ्ठल मंदिर दत्त मंदिर तसेच मारुती मंदिरात महिलांनी मोठी गर्दी केली होती.

इंग्रजी महिन्यानुसार या वर्षातील सर्वात पहिला सण म्हणून मकर संक्रातीला महत्त्वाचे स्थान आहे.या सणानिमित्त एकमेकांना घरोघरी जाऊन तिळगुळ रेवडी वाटत केले व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

महिलांसाठी हा सण खास असतो त्यामुळे सकाळपासूनच महिलांची लगबग दिसून येत होती घरोघरी पुरणपोळीचा बेत करण्यात आला होता या सर्वांचा आनंद लुटत सणाचा गोडवा वाढविला.

रामाचा ओवासा… सीतेचा ओवासा…
मकर मकर संक्रांत हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महिला एकमेकींना ओवासा देतात तसेच ओवासा देवालाही वाहिला जातो.त्यामुळे सर्वच मंदिरामध्ये महिलांची मोठी गर्दी होती सुगडमध्ये बोर,उसाचे कांडे, गव्हाच्या ओब्या, हरभरा, गाजर, ज्वारीची कणीस, तीळ इत्यादी साहित्य घालून त्याचे पूजन केले जाते.हे सुगड देवाला वाहिले जातात तसेच सवाष्णा महिलांना ते लुटले जातात त्यामुळे मंदिरात महिलांची गर्दी होती. ओवासा देताना रामाचा ओवासा घ्या… सीतेचा ओवास घ्या … असे म्हणत महिला मंडळी सुगड एकमेकींना देतात.

मोबाईल शुभेच्छांनी हाउस फुल्ल…
गेल्या काही वर्षांपासून शुभेच्छांचा वर्षाव देण्यासाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे सकाळपासूनच फोनचा इनबॉक्स मकर संक्रांतीच्या शुभेच्छांनी भरून वाहत होतें.व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर समाज माध्यमांचा वापर करून दिवसभर शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू होती.तिळगुळ घ्या… गोड गोड बोला… अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या छोट्या छोट्या स्टिकरचा वापर शुभेच्छांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचे दिसून आले.

karmalamadhanews24: