भिगवण जवळ कुर्ला एक्सप्रेसचे इंजिन बिघडले : तासभर वाहतूक विस्कळीत

भिगवण जवळ कुर्ला एक्सप्रेसचे इंजिन बिघडले : तासभर वाहतूक विस्कळीत

केत्तूर ( अभय माने) : मंगळवार (ता.6) रोजी सकाळी सोलापूरहून पुण्याकडे जाणारी कोईमतुर – मुंबई कुर्ला एक्सप्रेस या एक्सप्रेस (गाडी नंबर 11014 ) गाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने सकाळी 9.05 वाजता जिंती- भिगवन दरम्यान (किलोमीटर क्रमांक 302/5 ) या ठिकाणी बंद पडल्याने पाठीमागून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या सोलापूर पुण्याकडे जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस (गाडी नंबर 12158 ) सुमारे एक तास जिंती रोड स्थानकावर तर बेंगलोर – नवी दिल्ली के के एक्सप्रेस (गाडी नंबर 12627 ) सुमारे पन्नास मिनिटे पारेवाडी स्थानकावर थांबविण्यात आली होती.

 कुर्ला एक्सप्रेसचे इंजिन दौंड येथून आल्यानंतर ते बदलण्यात आले व सकाळी 10.10 मिनिटांनी गाडी (सुमारे एक तासाने) मुंबईकडे मार्गस्थ झाली त्यानंतर रेल्वे वाहतूकही सुरळीत झाली.

karmalamadhanews24: