उपळवटे येथे वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची केली सोय
उपळवटे(प्रतिनिधी) ;
माढा तालुक्यातील उपळवटे येथील जंगलातील वन्यजिवांसाठी आज पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपळवटे गावातील शेतकरी दत्तात्रेय घाडगे हे उपळवटे गावातील प्रगतीशील बागायतदार अमोल बाळासाहेब घाडगे यांच्या कडे गेले समर्थ घोरपडे या लहान मुलाने हि पक्षांसाठी याच जंगलामध्ये थोडी फार पाण्याची व्यवस्था केली होती. तेव्हा पासून आपण पण वन्यजिवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा सारखा विचार करत असलेले शेतकरी दत्तात्रेय घाडगे यांनी आज सकाळी अमोल बाळासाहेब घाडगे यांच्या कडे वन्यजिवांसाठी थोडं पाणी मागितले.
अमोल बाळासाहेब घाडगे यांच्या कडे पाणी कमी असल्यामुळे शक्य होईल तेवढे पाणी देण्याचा प्रयत्न करेन असे अश्वासन अमोल बाळासाहेब घाडगे यांणी दिले या दोघांमध्ये वाढत चाललेल्या ऊन्हाबध्दल चर्चा झाली. मानुस कोठे हि जाऊन आपली तहान भागवत असतो. पण वन्यजिवांचं काय? ते असल्या ऊन्हात आपली तहान कोठे भागवत असतील? असा प्रश्न शेतकरी दत्तात्रेय घाडगे यांना पडला होता वन्यजिवांसाठी पाण्याची भिक मागणारे शेतकरी दत्तात्रेय घाडगे यांचे विचार ऐकुन अमोल बाळासाहेब घाडगे यांना ते पटले, व खरोखरंच मुक्या प्राण्याबध्दल चं प्रेम आपुलकी जिव्हाळा शेतकरी दत्तात्रेय घाडगे यांच्या नजरेस दिसल्यामुळे अमोल बाळासाहेब घाडगे यांनी जसं पाणी उपलब्ध होईल तसं वन्यजिवांसाठी पाणी देण्याचं मान्य केलं. शेतकरी दत्तात्रेय घाडगे यांच्या वन्यजिवांबध्दलच्या भावना ओळखून अमोल बाळासाहेब घाडगे यांनी जंगलाच्या बाजुला असलेल्या मोठ्या खड्ड्यात वन्यजिवांसाठी पाणी सोडण्यात आले.
वन्यजिवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली शेतकरी दत्तात्रेय घाडगे यांनी वन्यजिवांची थोडीफार माहिती अमोल बाळासाहेब घाडगे यांना सांगितली शेतकरी दत्तात्रेय घाडगे यांचे विचार आवडले म्हणुन ऊन्हाळी पिकांचे पाणी बंद करुन वन्य जीवांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
Comment here