उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालययाध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालययाध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

माढा प्रतिनिधी
माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या,श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक मध्ये 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी माजी क्रीडाशिक्षक रामचंद्र माळी सर व विद्यालयाचे क्रीडाशिक्षक शब्बीर तांबोळी सर यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यास, प्राणायाम,ध्यान या विषयी माहिती दिली.तसेच योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

हेही वाचा – सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या; एक महिन्यानंतर सर्व विभागांचा आढावा मला द्या; आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

यावेळी कपालभाती,अनुलोम प्राणायाम तसेच भ्रामरी प्राणायाम ही घेण्यात आले.विद्यालयातील 700 विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे योगासने आणि योग प्राणायाम केला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ देशमुख साहेब तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच काही ग्रामस्थ यांनी या योग शिबिरात सहभाग घेऊन योगासने केली.अशा रीतीने विद्यालयांमध्ये योग दिन अतिशय उत्कृष्ट रीतीने संपन्न झाला.

फोटो ओळी – जागतिक योगा दिनानिमित्त योगा करताना श्री नंदिकेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक 

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line