*उन्हाळ्यापूर्वीच उजनीत पाण्याचा खडखडाट*
केत्तूर ( अभय माने) ऐन उन्हाळ्यात उजनी धरणातून सहा हजार क्युसेसने पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने उजनीचा पाणीसाठा 13.64 टक्केवर आला आहे.उजनी धरणातून 6.50 टीएमसी पाणी सोडले जाणार असून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने उजनीने मात्र तळाकडे वाटचाल सुरू केली आहे. हे पाणी 15 एप्रिल पर्यंत सोडले जाणार आहे. तर 15 एप्रिल ते 25 मे दरम्यान 6.70 टीएमसी पाणी भीमा सिना जोड कालव्यातून सोडले जाणार आहे.
गतवर्षी पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरूनही केवळ नियोजनाच्या अभावामुळे वराजकीय हस्तक्षेपामुळे नेहमीप्रमाणे उजनी लाभक्षेत्राचे वाळवंट होणार आहे.त्यामुळे उभी पिके, फळबागा जगविण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
” सतत पाणी खाली सोडले जात असल्याने उजनीच्या खाली सुकाळ तर पाणलोट लाभक्षेत्रात दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने खरे धरणग्रस्त शेतकरी चिंतेत आहेत. धरणासाठी जमिनी देऊन मोठा त्याग केलेले शेतकरीच दरवर्षी पाण्यापासून वंचित राहतात. वास्तविक सोलापूरकरांची तहान बंद जलवाहिनीतून भागवल्यास धरणग्रस्तांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळेल मात्र बंदीस्थ जलविहिनीचे भिजत घोंगडे ठेवले जात असल्याने धरणग्रस्त शेतकरी सतत तहानलेला अवस्थेत राहत आहे.
हेही वाचा – करमाळा येथे गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात भाजपाचा ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
होत असलेला विसर्ग –
नदीद्वारे- 6000 क्युसेस
मेन कॅनॉल – 2950 क्युसेस
कॅनॉल- 770 क्युसेस
वीज निर्मिती – 1600 क्युसेस
सिनामाढा – 333 क्युसेस
दहिगाव – 80 क्युसेस