उन्हाचा चटका! बाजारात रसदार , थंडगार फळांना मागणी वाढली!
केत्तूर ( अभय माने) करमाळा तालुक्यात उन्हाचा पारा वरचेवर वाढत आहे. होळीनंतर त्यामध्ये वाढत होत असून तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. यावर थंडगार उपाय म्हणून शीतपेय आणि थंड शरबत याचा खूप वाढला आहे. त्याबरोबरच उसाचा रस, काकडी, कलिंगड, खरबूज, पपई या पारंपारिक थंडावा असणाऱ्या फळांना देखील मागणी वाढली आहे.
रस्त्याच्या कडेला किंवा आठवडा बाजारात कलिंगड, खरबूज, पपई, काकडीला मागणी वाढली आहे कलिंगड 10 रुपयापासून तर खरबूज 20 रुपये नगापासून पुढे विक्री होत आहे. तर काकडी 20 रुपये किलो दराने विकली जात आहे.त्यातच मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना रमजान सुरू असल्यामुळे या रसदार फळांना मागणी वाढली आहे.
” बाजारात कलिंगड, खरबूज, पपई, काकडी आदी रसदार फळांना मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवकही होत असल्याने भाव मात्र कमीच आहेत.
अल्ताफ शेख, फळ विक्रेते,केत्तूर