करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण महत्त्वाचे; उमरड येथे प्रांजली पाटीलचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण महत्त्वाचे; उमरड येथे प्रांजली पाटीलचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

उमरड(प्रतिनिधी) दिनांक 30/07/2021 पावसाळ्यात वातावरणात आद्रतेचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे वेगवेगळ्या बुरशी, जिवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो व त्याचा विपरीत परिणाम जनावरांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होतो असे मत वांगी नं 1 येथे गोठ्याच्या स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करताना कृषिकन्या प्रांजली पाटील हिने व्यक्त केले.

पावसाचे पाणी गोठ्यातील शेण मलमूत्र यामध्ये मिसळून गोठ्यात दुर्गंधी पसरते आणि जनावरे वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात आणि त्यांचा परिणाम थेट जनावराच्या दूध उत्पादनावर होतो आणि शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागते असे होऊ नये म्हणून ब्लिचिंग पावडरची फवारणी करून गोठ्याची स्वच्छता काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे असे मत कृषिकन्या प्रांजली पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी गावातील नागनाथ देशमुख वैशाली देशमुख शोभा चव्हाण प्रणती पाटील आदी महिला व पुरुष उपस्थित होते. रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज आयोजित ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत वांगी नं 1 येथे कृषिकन्या प्रांजली पाटील या लोकांमध्ये जागृती करून लोकांना माहिती दिली.

हेही वाचा-करमाळा तालुक्यातील वांगीचे युवक धावले पूरग्रस्तांच्या मदतीला; वस्तूंचे किट घेऊन कोल्हापूर,सांगली कडे रवाना

बार्शीचे आमदार राऊत यांचे पुत्राच्या लग्नाला हजारोंची गर्दी; पण गुन्हा मात्र ‘त्या’ एकाच व्यक्तीवर

तिला प्राध्यापक डी एस मेटकरी, समन्वयक डॉक्टर डीपी कोरटकर, प्राचार्य आर जी नलवडे, प्राध्यापक एस एम एकतपुरे, प्राध्यापक एस आर आडत इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

litsbros

Comment here