करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

उमरड नजीकच्या वस्तीवर रात्री राहत्या घरातून चोरी; पोलीस पाटील कोठावळे यांची समयसूचकता व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांची कार्यतत्परता

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उमरड नजीकच्या वस्तीवर रात्री राहत्या घरातून चोरी; पोलीस पाटील कोठावळे यांची समयसूचकता व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांची कार्यतत्परता

उमरड (प्रतिनिधी) दिनांक 19/09/2021 रोजी रात्री अकरा ते साडे अकरा च्या दरम्यान उमरड नजीक गायकवाड वस्तीवर युवराज अजिनाथ गायकवाड यांच्या घरी रात्री सव्वा अकराच्या सुमारास चोरट्यानी चोरी केली. याची माहिती उमरडचे पोलीस पाटील अंकुश कोठावळे यांना दिली. त्यांनी लगेच ग्रामसुरक्षा यंत्राने अंतर्गत सुरू असलेल्या फोन कॉल वर चोरीची माहिती व सतर्कतेचा संदेश दिला तो फोन परिसरातील नागरिकांना तसेच पोलीस स्टेशन वर जाताच करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी तत्काळ पुढील सूचना देऊन जेऊर दूरक्षेत्र येथून पंधरा मिनिटांत पोलीस गाडी हजर झाली.

चोरट्यांनी रोख रक्कम पायातील पैंजण, टीव्ही व मोबाईल चोरून नेला होता. सर्व लोक आल्याचा अंदाज येताच चोरट्याने एक ठिकाणी चोरून नेलेला टिव्ही टाकला व पुढील काही अंतरावर मोबाईल सोडून पळून गेले. चोरी गेलेल्या मोबाईलचे लोकेश जेऊर दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी तत्काळ काढून दिले.

त्याच्या अनुषंगाने मोबाईल मिळेपर्यंत फॉलोअप घेत राहिले व सदर मोबाईल लोकेशन च्या आधारे गावातील तरुण वर्ग व पोलीस ठाण्यातील अधिकारी मोबाईल लोकेशन च्या आधारे मोबाईल पडलेल्या ठिकाणी जाऊन मोबाईल ताब्यात घेतला.

वस्तीवर कोणी नाही याचा अंदाज घेऊन चोरट्यानी चोरीचा प्रयत्न केला रोख वीस हजार रुपये व एक पैजन जोडी एटीएम कार्ड ड्रायव्हिंग लायसन आदि
एकूण 22 हजार रुपये किमतीचा माल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या त्या फोन कॉलने धोका टळल्याचे नागरिक बोलत आहे.

हेही वाचा-करमाळा तालुक्यातील पाथुर्डी गावात कोविड लसीकरण कॅम्प संपन्न; ‘इतक्या’ जणांनी घेतली कोविडची लस

आवाटी येथे अवैध वाळू उपसा सुरूच; नदीकाठची शेती धोक्यात; प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे जोमात

सदर प्रकरणी कामा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास चालू आहे जेऊर दूरक्षेत्र चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांचे सर्व ग्रामस्थांनी आभार मानले.

litsbros

Comment here