करमाळा

बापरे! उजनीचा पाणीसाठा मायनस ‘इतक्या’ टक्क्यांवर; पाऊस अजून रुसलेलाच; शेतकरी चिंताग्रस्त

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बापरे! उजनीचा पाणीसाठा मायनस ‘इतक्या’ टक्क्यांवर; पाऊस अजून रुसलेलाच; शेतकरी चिंताग्रस्त

केतूर (अभय माने) : उजनीचा पाणीसाठा हा पुणे धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसावर अवलंबुन असतो,यंदा जुन संपुन जुलै महिना उजडला तरी पुणे धरण क्षेत्रात म्हणावा तसा पाऊस बरसला नाही,त्यामुळे उजनीकरांची धाकधूक वाढू लागली आहे.

उजनीचा पाणीसाठा कमालीचा खालावलेला असुन तो उणे 11.59 टक्क्यांवर आला आहे.आषाढी वारीनंतर आणखी पाणीसाठा खलावणार असल्याने उजनीकरांचा डोळा आता पुणे धरण साखळी क्षेत्रातील पावसाकडे लागला आहे.
जुन महिन्यात पुण्याच्या डोंगरमाथ्यावर समाधानकारक पाऊस पडत असल्याने खडकवासला,

पानशेत,डिंभे,वरसगाव,टेमघर, पवना या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागते व जुलै, ऑगस्टच्या पावसात ही धरणे ओसंडुन वाहतात व पुढे उजनी धरण भरते आणि पुणे,सोलापूर, नगर जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटतो.राज्यातील 117 टीएमसी पाणीसाठा असलेले दोन नंबरचे धरण म्हणुन उजनीची ओळख आहे.

सध्या याच उजनीचा पाणीसाठा नीचांकीकडे वाटचाल करू लागला आहे.तशी उजनी करांची धडधड वाढू लागली आहे.

उजनी पाणलोट क्षेत्रात अध्याप पाऊस पडला नाही व पुणे धरण साखळी क्षेत्रातही म्हणावा तसा नसल्याने यंदा उजनी भरणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उजनीचा पाणीसाठा उणे 11.59 टक्केवर आला असुन, पंढरीच्या वारीसाठी आत्ता पासुनच एक हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.

वारी जसजशी सोलापुरात मार्गस्थ होईल तसा विसर्ग वाढवण्याचे संकेत आहेत.त्यामुळे आषाढी वारीनंतर तर उजनीचा पाणीसाठा कमालीचा घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पुणे धरण साखळी क्षेत्रातील पावसाकडे उजनीकरांचा डोळा लागुन राहिला आहे.

उजनीवरील पुणे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठाही तळाकडे गेला आहे.

पुणे जिल्ह्यातील पाणीसाठा टीएमसीमध्ये पुढील प्रमाणे
माणिकडोह — 0.17
पेडगाव — 0.25
वडूज — 0.11
डिंभे — 0.63
घोड — 0.18
विसापूर — 0.22
विल्हेवाडी — 0.02
कळमोडी — 0.10
चासकमान – 0.50
भामा आसखेड – 2.25
वडुवळे – 0.02
आंदा – 1.63
पवना – 1.51
कासार साई – 0.15
वरसगाव – 1.15
पानशेत- 1.16
खडकवासला- 0.33
नीरा देवघ– 0.37
भाटघर — 1.34
वीर — 3.82
गुंजवनी — 0.67
उजनी — 6.21

litsbros

Comment here