उजनीत सोडले एक कोटी मत्सबीज; मत्स्य उत्पादन वाढण्याची आशा!     

उजनीत सोडले एक कोटी मत्सबीज; मत्स्य उत्पादन वाढण्याची आशा!        

केत्तूर (रवि चव्हाण )महाराष्ट्र शासन आणि मत्स्यव्यवसाय विभाग पुणे यांच्या वतीने उजनी जलाशयामध्ये एक कोटी मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय झालेला आहे.

 त्याचाच एक भाग म्हणून आज केत्तूर येथे उजनी जलाशयात आठ लाख मत्स्यबीज सोडण्यात आले. गेल्या २८ ते ३० वर्षापासून उजनी जलाशयात कधीच इतके मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज सोडण्यात आले नव्हते. 

परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठ्या प्रमाणात उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्यात आले. 

यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी,भाजपाचे पदाधिकारी, मच्छिमार बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी जे मच्छीमार बांधव मासेमारी करतात त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट होती.

यावेळी विजय शिखरे प्रादेशिक उपायुक्त मस्त व्यवसाय विभाग पुणे,जलसंपदा विभागाचे एस.एस. झोळ उपविभागीय अधिकारी, एस.आर.मगदूम शाखाधिकारी, 

के.एन. सौंदाने कनिष्ठ अभियंता व क्षेत्रीय कर्मचारी , सरपंच सचिन वेळेकर, उपसरपंच भास्कर कोकणे, माजी सरपंच प्रवीण नवले, भाजपचे किसान मोर्चाचे चिटणीस दादासाहेब येडे ,भाजपा जिल्हा सदस्य अमोल जरांडे, 

भाजपा अ. जा. मोर्चाचे संघटन सरचिटणीस सचिन खराडे, पै. नितीन इरचे, मच्छीमार संघटनेचे हरिश्चंद्र कनिचे मच्छीमार बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

karmalamadhanews24: