उजनी पाणलोट क्षेत्रातील केळी उत्पादक शेतकरी भरपाईच्या प्रतिक्षेत; मार्च एप्रिल महिन्यात सोळाशे एकरावरील केळीच्या बागा जमिनदोस्त

उजनी पाणलोट क्षेत्रातील केळी उत्पादक शेतकरी भरपाईच्या प्रतिक्षेत;
मार्च एप्रिल महिन्यात सोळाशे एकरावरील केळीच्या बागा जमिनदोस्त

करमाळा (प्रतिनिधी);
मार्च व एप्रिल महिन्यात करमाळा तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रातील केळी बागांना वादळी वाऱ्याचा प्रचंड तडाखा बसला.त्यामुळे काढणीस आलेल्या बागांसह सोळाशे एकर साध्या केळी सह वेलची केळी बागा जमिनदोस्त झाल्या.

परिणामी शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.या पाश्र्वभूमीवर महसूल विभागाकडून नुकसान ग्रस्त बागांची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले.

मात्र चार महिन्याहून अधिक कालावधी लोटला तरी अद्यापपर्यंत एका ही केळी उत्पादक शेतकर्याला मदत मिळाली नाही.

मार्च व एप्रिल महिन्यात साध्या केळीसह वेलची केळीला उच्चांकी दर मिळत असताना अचानक वादळी वाऱ्यामुळे
शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटामुळे हिरावला.

उद्ध्वस्त झालेल्या केळी बागांची विल्हेवाट लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला. त्यामुळे शेतकरी दूहेरी संकटात सापडला.खते बी बियाणे औषधे मजूरी यात गुंतवलेले भांडवल ही बूडाले.परंतु प्रशासनाकडून अद्यापर्यंत कसलीही मदत जाहीर करण्यात आली नाही.

त्यामुळे शेतकर्यांकडून संताप व्यक्त केला जात असून लोकप्रतिनिधींनी विधीमंडळात प्रश्न मांडून शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.

वादळी वाऱ्यामुळे आठ दिवसांवर काढनीस आलेली तीन एकर केळी बाग मार्च महिन्यात पूर्ण पणे उद्ध्वस्त झाली.एकूण आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाकडून पंचनामा ही करण्यात आला.परंतु अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही
गणेश शिंदे.
केळी उत्पादक. वाशिंबे ता करमाळा

मार्च व एप्रिल महिन्यात नुकसान झालेल्या शेकर्यांची माहीती शासनास कळवली आहे.यासाठी शेतकर्यांना पैसै ही मंजूर झाले आहेत.यासाठी शासनस्तरावरुन शेतकर्यांच्या खात्यावर आँनलाईन रक्कम लवकरात लवकर वर्ग करण्यात येईल.
विजयकुमार जाधव.
प्र.तहसीलदार करमाळा.

हेही वाचा – विहिरीचे बांधकाम चालू असताना अचानक कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले चार कामगार

मुंबई ते सोलापूर वंदेभारत एक्सप्रेसला ‘ हे’ असतील नवीन थांबे, कधीपासून होणार अंमलबजावणी? वाचा सविस्तर

उजनी पाणलोट क्षेत्रासह सोलापूर जिल्ह्यात निर्यातक्षम केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.महाराष्ट्रातुन सर्वाधिक निर्यातक्षम केळी याच परिसरातून होते.परंतु मागील दोन तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे वादळी वाऱ्याने केळीच्या बागा उध्वस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे नुकसान ग्रस्त बागांना भरपाई मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवने गरजेचे आहे.

– विजय रोकडे.
चेअरमन वांगी विविध कार्यकारी सोसायटी

karmalamadhanews24: