उजनीच्या पाण्याचे पश्चिम भागातील शेतकऱ्यांकडून उत्साहात पूजन
केत्तूर (अभय माने) सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण 100% भरल्याच्या नुकतेच मौजे कोंढार -चिंचोली ते डिकसळ पूल येथे पश्चिम भागातील मान्यवर शेतकरी वर्गाच्या वतीने उजनीच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.
याप्रसंगी पश्चिम भागातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. माननीय सूर्यकांत पाटील ,एडवोकेट नितीन , माननीय राजाभाऊ धांडे माननीय प्रा.सुहास गलांडे , राजाभाऊ बाबर ,डॉक्टर गोरख गुळवे, कात्रजचे सरपंच मनोहर हंडाळ , सरपंच सुनील ढवळे, केतुरचे सरपंच सचिन वेळेकर ,खातगावचे सरपंच अविनाश मोरे ,एडवोकेट अजित विघ्ने, एडवोकेट अमित गिरंजे , लतीश लकडे पाटील ,दौंड ऍग्रोचे ॲग्री सुपरवायझर उदय पाटील,हिरालाल गायकवाड , सिध्देश्वर जाधव ,महादेव बाबर ,संग्राम पाटील ,
शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष निळकंठ शिंदे ,कात्रजचे पोलीस पाटील सोमनाथ पाटील ,खातगावचे उपसरपंच दत्तात्रय कोकरे ,संतोष झेंडे ,आदिनाथ कोकरे ,संपत रणसिंग,संदीप मोरे ,अजित मोरे ,नाना काळे , दत्तु ढवळे ,शहाजी ढवळे , नवनाथ साळुंखे ,सुरेश साळुंखे ,सुनील गलांडे ,दिलीप धांडे ,राजेंद्र तावरे ,बापू नगरे , काका साळुंखे ,अर्जुन वारगड तसेच मान्यवर मंडळी उपस्थित होते याप्रसंगी पाण्याचे जलपूजन करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
जलपुजना प्रसंगी डिकसळ ते कोंढार चिंचोली दरम्यान होत असणाऱ्या नवीन पुलाचे कामाबाबत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आमदार. संजयमामा शिंदे यांचे देखिल आभार व्यक्त करण्यात आले तसेच सदरचे काम होईपर्यंत जुन्या पुलाचे किरकोळ दुरुस्त्या करणेबाबत सुचना मांडण्यात आल्या. याप्रसंगी प्राध्यापक सुहास गलांडे, सूर्यकांत पाटील, एडवोकेट नितीन राजे भोसले, एडवोकेट अजित विघ्ने, निळकंठ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.