उजनी लाभक्षेत्रात अवकाळी पावसाचा शिडकावा

*उजनी लाभक्षेत्रात अवकाळी पावसाचा शिडकावा*

केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्र परिसरात मंगळवार (ता. 1 ) रोजी रात्री दहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसात वाढलेल्या तापमानाचा पारा या पावसामुळे काहीअंशी कमी झाल्याने नागरिकांना उन्हाळ्यात ” थंडा थंडा, कुल कुल ” चा अनुभव मात्र मिळाला.

हेही वाचा – मेजर अक्रुर शिंदे यांना अँन्टी करप्शन बोर्ड दिल्लीचा महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार.

रमजान ईद च्या निमित्ताने कुंभेज मधे दिसून येतेय सामाजिक ऐक्य – दिग्विजय बागल

झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या तर इतर झाडांची पाने गळून पडली. हवामान विभागाने मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे.

कांदा, गहू उत्पादकांची तारांबळ –
परिसरात काही ठिकाणी कांदा तसेच गहू कापणी सुरू आहे कांदा उत्पादकांनी कांदा कापून शेतातच झाकून ठेवला आहे. मोठा पाऊस झाल्यास हा कांदा भिजून मोठे नुकसान होणार आहे शेतातील कामे उरकण्यासाठी शेतकरी गडबड करीत असल्याने मजुरांना मात्र अच्छे दिन आले आहे.

karmalamadhanews24: