उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवेगव्हाण येथे विविध सामाजिक उपक्रम

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवेगव्हाण येथे विविध सामाजिक उपक्रम

करमाळा (प्रतिनिधी);
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना शाखा दिवेगव्हाण यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले तसेच फायबरच्या चार मोठ्या कचरा कुंड्या भेट देण्यात आल्या.त्याचबरोबर विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले.

पर्यावरणाचे महत्व जाणून संपूर्ण गावात भव्य प्रमाणात वृषारोपन कार्यक्रम घेण्यात आला .युवासेना उपतालुकाप्रमुख अभिषेक मोरे यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम राबविण्यात आले. 

हेही वाचा – तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे करमाळा येथे आयोजन; शिक्षणाधिकारी सोलापूर यांचे हस्ते होणार पारितोषिक वितरण

स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट येथे मोफत होमिओपॅथी शिबीराचे आयोजन; विश्वस्त भारतराव शिंदे पाटील यांनी दिली माहिती

यावेळेस, सरपंच हनुमंत खाटमोडे,अनिकेत पाडुळे, ज्ञानेश्वर मोरे, तुकाराम खाटमोडे, जुबेर शेख, संग्राम मोरे प्रथमेश खाटमोडे, शेखर मोरे, सागर मोरे, शाहू मोरे, हरी मोरे, रुषीकेश मोरे,संदेश पाडुळे, चक्रधर पाडुळे, सौरभ शिंदे,सुशील तनपुरे, माऊली पाटील, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

karmalamadhanews24: