*ऊस तोडणीसाठी ऊस उत्पादकाची आर्त हाक*
केत्तूर (अभय माने) यावर्षी करमाळा तालुक्यातील चारही साखर कारखाने बंद आहेत त्यातच विधानसभा निवडणुकीमुळे ऊस गाळप हंगाम उशिराने सुरू झाला त्यातच भर म्हणजे ऊसतोड मजुराही कमी प्रमाणात दाखल झाले त्यामुळे ऊस कारखान्याकडे घालवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरश सरोहोलपट सुरू आहे.काय झालं सध्या ऊस तोडणीसाठी ऊस तोड करणाऱ्या मजुरांना 80 रुपये टनाप्रमाणे ज्यादा पैसे द्यावे लागत आहेत.(ऊस तोडणीचा फड बदलल्यानंतर या रकमेत वाढत होत आहे ) तर ड्रायव्हरचे जेवणही द्यावे लागत आहे.
तालुक्याचे उजनी लाभक्षेत्र परिसरातील ऊस बारामती अग्रो, बारामती (पुणे) व अंबालिका शुगर, कर्जत (अहिल्यानगर ) या कारखान्याकडे जात आहे.
केत्तूर येथील शेतकरी ज्ञानदेव नारायण खाटमोडे यांचा हिंगणी हद्दीतील गट नंबर 69 मधील आडसाली ऊस 19 महिने होऊनही कोणताही कारखाना येत नाही. आज ऊस जाईल उद्या ऊस जाईल या कारणामुळे त्यांनी ऊसाला पाणी दिले नाही.याला दोन महिन्याचा कालावधी झाला त्यामुळे उभा ऊस पाण्याअभावी जळून /वाळून चालला आहे.
श्री किर्तेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सह शिवमहापुजेचे आयोजन.
याबाबत खाटमोडे यांनी करमाळा तहसीलदाराकडे तक्रार करूनही अध्यापही कोणत्याही कारखान्याने याची दखल घेतली नाही त्यामुळे कोणी ऊस नेता का ऊस..? असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
परिसरात यावर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्याने आणखी महिनाभरच ऊस गाळप हंगाम चालू राहिल असे बोलले जात आहे.