करमाळामहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

ऊस वाहतूकदारांचे प्रश्न तात्काळ निकाली काढा; जनशक्ती चे महाराष्ट्र राज्य साखर संघ व वेस्ट इंडियन शुगर मिल्स ला दिले निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ऊस वाहतूकदारांचे प्रश्न तात्काळ निकाली काढा; जनशक्ती चे महाराष्ट्र राज्य साखर संघ व वेस्ट इंडियन शुगर मिल्स ला दिले निवेदन

करमाळा (प्रतिनिधी) ; सन २०२१-२२ गळीत हंगाम दीड ते दोन महिन्यामध्ये सुरू होणार आहे शेतकऱ्यांनी आपले वाहन ऊस वाहतुकीसाठी विविध साखर कारखाना बरोबर करार केले आहेत. 2016 – 2017 घरापासून वाहतूक दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. त्यावेळेस डिझेल दर 64 रुपये प्रति लिटर होते. आज डिझेल दर जवळपास शंभर रुपये प्रति लिटर झालेला आहे.

तरीही कारखानदार त्यांना दरवाढ देण्यास तयार नाही. शेतकरी जोडधंदा म्हणून शेतकरी ऊस वाहतुकीचा व्यवसाय करत आहेत. वाहतुकीच्या वाहनांची संख्या जास्त असल्याचा कारखानदार गैरफायदा घेत आहेत.

वाहन घरी ठेवून शेतकऱ्यांना परवडत नाही व वाहतूक करून तोटा होतो. अशा अवस्थेमध्ये शेतकरी सापडलेला आहे. वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यास कारखान्यांकडून ॲडव्हान्स जादा दिला जायचा आता तर काही कारखाने ऍडव्हान्स सुद्धा देत नाहीत. ॲडव्हान्स देऊन सुद्धा टोळी  येईल का नाही याची खात्री नसते.

 

आपण ज्या कारखान्यात ऊस वाहतूक करत आहे तो कारखाना वाढ देणार आहे का नाही देणार असेल तर किती देणार हे त्या वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचे आहे. म्हणून माझी माननीय साखर आयुक्त व सर्व कारखानदार यांना विनंती आहे की आपण आपल्या बॉयलर प्रतिपादन दिवशी ऊस वाहतूक दरवाढ जाहीर करावी.

तसेच ऊस तोडणारी टोळी न आल्यास एखाद्या शेतकऱ्याला जबाबदार धरण्याऐवजी अर्धी जबाबदारी शेतकऱ्यांनी उचलावी व अर्धी जबाबदारी त्या साखर कारखान्याने उचलावी या पद्धतीने धोरण जाहीर करावे असे निवेदन जनशक्ती संघटनेने महाराष्ट्र साखर संघ व वेस्ट इंडियन शुगर मिल्स यांना दिले आहे. 

शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस घातल्यानंतर त्यांना किती दर मिळणार व किती टप्प्यात मिळणार हे काहीच माहीत नसते त्याला आपल्या शेतातील ऊस लवकरात लवकर तोडून कारखान्यास घालने एवढेच त्याचे ध्येय असते. या गोष्टीचाही गैरफायदा कारखानदार घेत आहेत त्यामुळे आपण कारखान्यास पुरवलेल्या उसाचा किती दर मिळणार व किती टप्प्यात किती कालावधीत मिळणार हे त्या शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचे आहे.

हेही वाचा- एक मोठं स्वप्न पूर्ण होण्याआधीच संपलं; करमाळयाच्या बंडूचा हरियाणात मृत्यू; आज झाले अंत्यसंस्कार

फुकट्या प्रवाशांच्या विरोधात करमाळा एसटी आगार राबवणार विशेष मोहीम; वाचा सविस्तर

म्हणून माझी माननीय साखर आयुक्त व सर्व साखर कारखानदार यांना विनंती आहे की आपण बॉयलर  प्रतिपादनच्या दिवशीच उसाच्या दराबाबत इत धोरण जाहीर करावे ही विनंती.

          एका बाजूला हंगाम सुरू होण्याची गडबड असते आणि त्याच वेळेस विविध वाहतूक व शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत असतात त्यामुळे गोंधळ निर्माण होतो अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मी हे निवेदन देत आहे जेणेकरून कारखानदारांना निर्णय घेणे सोपे होईल मला आशा आहे की सर्व साखर कारखानदार योग्य तो शेतकऱ्यांच्या व ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील.

जर कारखान्यावर दोन ते तीन दिवस ज्यामिंग झाले तर ड्रायव्हर चे जेवण कारखान्याकडून मिळावे.

‌ ड्रायव्हरची बाथरूम आणि राहण्याची सोय करावी.

‌ पाठीमागील कमिशन डिपॉझिट काही कारखान्यांनी दिलेले नाहीये, ते त्वरित द्यावे.

‌ वाहन मालकाला कुठूनही वजन काटा करून येण्यास परवानगी मिळावी.

‌ प्रत्येक मस्टर ला कारखान्याने वाहतूक रोख द्यावी.

‌ ड्रायव्हर आणि लेबर च्या विम्यासाठी पैसे घेतले जातात पण विमा दिला जात नाही.

  

            तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण माझ्या विनंतीचा विचार कराल नाहीतर ऊस वाहतूक दर व उसाच्या दराबाबत सविस्तरपणे दर जाहीर केल्याशिवाय कुठलाही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही त्यामुळे जी परिस्थिती उद्भवेल व त्याचे नुकसान होईल त्यास मी जबाबदार राहणार नाही. असे अतुल खूपसे बोलताना म्हणाले

litsbros

Comment here