उमरड येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन
केतूर( अभय माने) ; उमरड ता.करमाळा येथे महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या अंतर्गत मंडल कृषी अधिकारी जेऊर यांचे वतीने कृषी संजीवनी सप्ताह मोहीम 2021 चे आयोजन करण्यात आले. कोरोनाचे सर्व नियम पाळत सदर कार्यक्रम प्रगतशील शेतकरी प्रशांत वामनराव बदे यांच्या शेतात घेण्यात आला.
यावेळी कृषी सहाय्यक मुळे जी.एन. यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली तसेच आपल्या प्रास्ताविकात कृषी संजीवनी साप्ताहिकाचा उद्देश सांगून यात शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात कृषी पर्यवेक्षक बी.एम. बळी यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवडीचे आधुनिक तंत्र व उत्पादन वाढीचे उपाय सांगितले.
या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी प्रमोद बदे,सरपंच बापू चोरमले,उपसरपंच संदिप बदे यांचेसह गावातील शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा- अकरावी प्रवेश:शिक्षण विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हृदयद्रावक! अवघ्या ८ महिन्याच्या तान्हुल्याला पोटाला बांधून आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी कृषी विभागाचे एम. डी. मारकड पर्यवेक्षक जेऊर,कृषी सहायक बी.के. बेरे,एस. एम. सरडे,के. यु. सरडे,आर.गव्हाणे,आर. व्ही.सरडे इत्यादींनी परिश्रम घेतले.
Comment here