करमाळा

उमरडच्या सरपंच पदी लालासाहेब पडवळे यांची बिनविरोध निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उमरडच्या सरपंच पदी लालासाहेब पडवळे यांची बिनविरोध निवड

उमरड(प्रतिनिधी)दिनांक 23/09/2022 रोजी उमरड येथील रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये सरपंच पदासाठी लालासाहेब नामदेव पडवळे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस आय काझी यांनी निवड झाल्याचे घोषित केले.

त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून समाधान हरिश्चंद्र वलटे यांनी सही केली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साई अडगटाळे तलाठी उमरड त्यांनी काम पाहिले.

पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद गवळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बदे, दत्तात्रेय बदे, बापूराव चोरमले, मुकेश बदे, संदीप बदे, समाधान वलटे उपस्थित होते.

litsbros

Comment here