करमाळाधार्मिक

उमरड येथे ‘एक गाव एक गणपती’ परंपरा अखंडितपणे चालू ; शांततेत शासनाच्या नियम व अटींचे पालन करून विसर्जन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उमरड येथे एक गाव एक गणपती परंपरा अखंडित चालू ; शांततेत शासनाच्या नियम व अटींचे पालन करून विसर्जन

उमरड (प्रतिनिधी); दिनांक 19/09/2021 उमरड येथे एक गाव एक गणपती परंपरेनुसार चालत आलेली पद्धत याही वर्षी चालू. करमाळा तालुक्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल हिरे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उमरड येथे प्रतिवर्षीप्रमाणे एक गाव एक गणपती परंपरा जपण्यात आली.

याही वर्षी सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने याही वर्षी एक गाव एक गणपती स्थापना शासनाने दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन करून करण्यात आली.

हेही वाचा- करमाळा शहरातील नागरिकाचा प्रामाणिकपणा; सापडलेले रोख दोन लाख रुपये केले पोलिसांच्या स्वाधीन

मनोहर भोसले करमाळा पोलिसांच्या ताब्यात; आरोग्य तपासणी करून डांबला तुरुंगात

गावातील मंडळाचे अध्यक्ष सचिन कोठावळे, अण्णा पठाडे, परशुराम गायकवाड, अतुल कोठावळे, बंकट बदे, योगेश टकले, गणेश बदे, शैलेश बदे, अरुण बदे, सोमनाथ पठाडे, साहेबराव कोठावळे, राघू बदे, शहाजी बदे, किरण बदे, समाधान बदे, बापू बदे, मनोज पठाडे, मुकेश बदे,लाला बदे यांच्या प्रयत्नाने एक गाव एक गणपती परंपरा खंडित चालू आहे.

गणपतीचे विसर्जन ही सर्व शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून करण्यात आले. विसर्जना दिवशी महाप्रसादाचे नियोजन प्रदीप चोपडे यांनी प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी केले.

या कामी जेऊर दूरक्षेत्र चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लवळे यांनी चोख बंदोबस्त ठेवत विसर्जन शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करून शांततेत झाले.

litsbros

Comment here