करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

उजनी धरण झपाट्याने होतेय रिकामे; आता उरले ‘इतके’ पाणी; वाचा आजची स्थिती व सविस्तर आकडेवारीसह.

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनी धरण झपाट्याने होतेय रिकामे; आता उरले ‘इतके’ पाणी; वाचा आजची स्थिती व सविस्तर आकडेवारीसह

केतूर (अभय माने) ; सोलापूर, पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे उजनी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे सुमारे 111 टक्के व 123 टीएमसी पाणीसाठा झालेले उजनी धरण पावसाळ्यात धरणामध्ये अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने हे पाणी खाली सोडून देण्यात आले होते.

परंतु, सध्या सोलापूरला नदी,कॅनॉल बोगद्याद्वारे पाणी सोडल्याने उजनी जलाशयाचे हे पाणी मोठ्या वेगाने व झपाट्याने कमी होताना दिसत आहे. सध्या धरण 81.55 टक्केवर येऊन ठेपली आहे.

पाणीसाठा एवढ्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने उजनी फुगवटा तसेच लाभक्षेत्रातील परिसरातील शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.

पाणीसाठा घटल्याने उघडा पडलेला भूभाग

आता कुठे उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीसाठा एवढ्या झपाट्याने खाली जात असल्याने शेतकऱ्यांनी सखल भागात पाईपलाईनचे पाईप,केबल वाढवणे वाढवावे लागत आहे.

शासनाने उजनी वरून सोलापूर साठी पाणी सोडताना शेतकऱ्यांच्या गरजांचा विचार करून पाणी सोडले होते परंतु, या पाण्याचा वापर काटकसरीने होणे गरजेचे आहे अन्यथा उजनी धरण रिकामे होण्यास वेळ लागणार नाही.

— उजनीची आजची स्थिती —
एकूण पाणीसाठा — 3326.01 दलघमी
उपयुक्त पाणीसाठा — 1517.20 दलघमी
पाणी पातळी —– 495.965 मिटर
टक्केवारी -81.55 % 43.69 टीएमसी (मागीलवर्षी 86.90%)

litsbros

Comment here