आरोग्यकरमाळापुणेमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

उजनीत जमा होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रदूषणात भर; पाणी होते कधी हिरवट तर कधी काळसर.. जलचरांसह माणसांचे आरोग्य धोक्यात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनीत जमा होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रदूषणात भर; पाणी होते कधी हिरवट तर कधी काळसर.. जलचरांसह माणसांचे आरोग्य धोक्यात

केतूर ( अभय माने) पुणे व परिसरातील मैलायुक्त पाणी तसेच रासायनिक पदार्थांनी उजनी दूषित झाली असतानाच आता उजनी धरणामध्ये प्लास्टिक कागद ,कॅरीबॅग व प्लास्टिकचे,बिस्किट पुड्याचे कव्हर, कुरकुऱ्याचे रिकाम्या पाऊच व इतर विविध प्रकारच्या वस्तू पावसाळ्यातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाहत येऊन धरणात साठले आहे. प्लस्टिक कुजत नसल्याने आणि अनेकदा मासे व इतर जलचर पाणी त्यांचे अन्न खाण्याच्या ओघात गिळकृत करीत असल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

उजनी धरणातील वाढते पाणीप्रदूषण हा चिंतेचा विषय बनलेला असून त्याला रोखणे ही प्रशासनाची डोकेदुखी बनले आहे. उजनी धरणातील पाण्यावरती मातब्बर राज्यकर्त्यांनी विकासाच्या नावाखाली अनेक कारखाने ,साखर कारखाने, रसायनयुक्त युक्त कंपन्या व इतर छोटे मोठे उद्योग नदीकाठच्या पाण्याच्या आधारावरती आणून बसवले आहेत.

संबंधित कंपन्यांमधून निघणारे प्रदूषित पाणी मोठ्या टाकीत साठवून ठेवून, पावसाच्या दिवसात नजीकच्या ओढ्या नाल्यांना कोणतीही प्रक्रिया न करता जसेच्या तसे सोडून दिले जाते. परिणामी पुन्हा ते प्रदूषित पाणी उजनीत मिसळत आहे. यामुळे उजनीतील पाणी प्रदूषण थांबवण्यासाठी कोणीही कितीही ओरडले आणि काही केले तरी हे प्रदूषण थांबण्याचे नाव घेत नाही.

त्यात आता नव्याने प्लास्टिक कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या ,बिसलेरीच्या बाटल्या व प्लास्टिक पासून बनवलेल्या विविध वस्तू उजनी धरण परिसरात मोठ्या संख्येने वाहत येऊन नदीपात्रात सर्वत्र विखुरलेली दिसत आहे.

राज्य सरकारने प्लास्टिक ला बंदी घातलेली असली तरी आज सर्व स्तरावर ती प्लास्टिकचा वापर सर्रास केला जात आहे. यामुळे बहुतांश प्लास्टिकच्या पिशव्या ह्या उघड्यावरचे टाकून दिल्या जात आहेत.ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या माध्यमातून हा सर्व कचरा उचलून नजीकच्या ओढ्या नाल्यांना लगत टाकून दिला जात आहे.

परंतु अनेकदा पाळीव व फिरस्ती प्राणी प्लास्टिक मधील गोड-धोड अन्न खाण्याच्या ओघात प्लास्टिकच्या पिशव्याच गिळणकृत करून जीव धोक्यात घातल्याचे पाहिले आहे. अगदी याचप्रमाणे ओढ्यालगत सर्व प्लास्टिक कचरा हा पावसाळ्याच्या दिवसात पाण्याबरोबर वाहत येऊन उजनी धरणात साठत आहे.

पाण्यातील प्लास्टिक कुजत अथवा नष्टही होत नाही परिणामी अनेकदा अनेक मासे व जलचर प्राणी आपले भक्ष गिळंकृत करण्याच्या ओघात प्लास्टिकचे तुकडेही त्यांच्या पोटात जात असल्याने जलचरांचे अस्तित्वही धोक्यात सापडले आहे.

पावसाळ्यानंतर उजनी जलाशयाच्या पाण्याचा रंग वारंवार बदलत असतो तो कधी हिरवट, कधी काळसर, तर कधी न तांबूस असा होतो हा सर्व खेळ उजनी परिसरातील एमआयडीसीतील टाकाऊ रासायनिक पदार्थ तसेच पुणे पिंपरी चिंचवड भागातील मैलायुक्त पाणी थेट उजनी जलाशयात येत असल्याचा आहे.

असे हानिकारक पदार्थ किंवा वस्तू येऊ नयेत यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने दक्षता घेतली नाही तर हे पाणी विष बनल्याशिवाय राहणार नाही हेच खरे.हे होऊ नये यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे.

” उजनी परिसर जैवविविधतेसाठी अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी शेकडो प्रकारचे स्थलांतर पक्षी नित्याने येतात. प्रदूषण असेच वाढत चालला तर पक्षी वैभव संकटात येईल.धरणात साठलेल्या पाण्यात अमाप पर्यावरणपूरक जीवजंतू असतात. प्लॅस्टिक कचऱ्यामुळे ते लोप पावतील परिणामी पर्यावरणाचे समतोल बिघडेल. सर्वांनी वेळीच सावध बाळगण्याची गरज आहे.”

– डॉ.अरविंद कुंभार, पर्यावरण अभ्यासक.

litsbros

Comment here