करमाळा

आनंदाची बातमी: उजनीचे अर्धशतक, क्लिक करुन वाचा पाण्याची सविस्तर आकडेवारी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आनंदाची बातमी: उजनीचे अर्धशतक, क्लिक करुन वाचा पाण्याची सविस्तर आकडेवारी

केतूर ( अभय माने) : पुणे जिल्हा परिसर, भीमा खोरे, तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला असला तरीही, आज शनिवार (ता.31) रोजी उजनी जलाशयाच्या पाणी साठयाने मात्र अर्धशतक पार केल्याने उजनी लाभक्षेत्र तसेच पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

ऐन उन्हाळ्यात उजनी जलाशयाच्या पाणीसाठा मायनस 23 टक्के वर गेला होता परंतु, 22 जुलै रोजी तो प्लसमध्ये येण्यास सुरुवात झाली होती नऊ दिवसात जलाशयाचा पाणीसाठा सरासरी 73 टक्के (मायनस 23% ) धरून 49.99 टक्के एवढा झाला आहे.

पुणे जिल्ह्यात असणारी कळमोडी, भाटघर, खडकवासला, वीर ,गुंजवणी, आदि धरणे भरली आहेत वा भरण्याच्या मार्गावर असल्याने आगामी काळात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उजनीतून बोगद्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी हळूहळू जोर धरत आहे उजनी मायनस मधून पुढे गेल्यामुळे + 30 % गेल्याशिवाय उजनीतून पाणी सोडले जात नाही मात्र सध्या उजनी 49. 99 टक्केवर गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पाणी पातळी 494.315 मिटर
पाणीसाठा – 2561.27 दलघमी
उपयुक्त पाणीसाठा-758.46
सध्याची टक्केवारी -49.99 %

धरणात होणारी आवक

दौंड – 11365 क्यूसेक
बंडगार्डन -13116 क्युसेक
(31/7/21 सायंकाळी 6 वाजेपर्यत )

litsbros

Comment here