करमाळापुणेशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

उजनी मायनस 23 टक्क्यांवरून मायनस 5 टक्क्यांवर; उजनी धरण पाणलोट धरणसाखळीत 6529 मि. पावसाची नोंद

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनी मायनस 23 टक्क्यांवरून मायनस 5 टक्क्यांवर; उजनी धरण पाणलोट धरणसाखळीत 6529 मि. पावसाची नोंद

उजनी धरण क्षेत्रातही 197 मि.मी पावसाची नोंद
45 दिवसात केवळ 18.77 % ने वाढ

केतूर (अभय माने):- पुणे जिल्हा व परिसर तसेच उजनी लाभ क्षेत्रातही मोठा पाऊस होत नसल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु रिमझिम पावसाने धरणाच्या साठ्यात वेगाने वाढेल ही अपेक्षा मात्र फोल ठरली असली तरी,जलाशयाची पाणीपातळी वजा 23 टक्केवर गेली होती ही पाणी पातळी आता सध्या मात्र 5 टक्केवर आल्याने पावसाळा सुरू झालेपासून पाणीसाठया मध्ये जवळजवळ 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चालू पावसाळी हंगामाच्या सुरूवातीच्या 45 दिवसांत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या धरणसाखळी क्षेत्रात 6529 मि.मी  तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 197 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मात्र उजनीत समाधानकारक वाढ झालेली नसल्याने शेतकऱ्यांत निर्माण झालेला आनंद वातावरण हळहळु चिंतेत बदलु लागले आहे.

सद्यस्थितीला उजनी धरणाची टक्केवारी तब्बल उणे 23 टक्क्यांपर्यंत गेली होती.त्यात या वजा 17.77 % त वाढ होवुन ती वजा 6..00% वर आली आहे, सध्या उजनी धरणाची पाणीपातळी मी, एकूण पाणीसाठा 490.540, 1708.25 दलघमी तर मृतसाठा उणे 94.56 दलघमी तर टक्केवारी वजा 5.00 % एवढी नोंदविण्यात आला आहे.

उजनीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 45 दिवसात 6529 मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे उजनी धरणात यंदा पाणीसाठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पावसामुळे हवेतील उष्णता कमी होऊन आद्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण 7.50 मिमीवरून ते 0.81 मिमीवर खाली आले आहे.

उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या 18 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जरी पाऊस चालु असला तरी त्याचा फायदा अद्यापपर्यंत उजनी धरणाला झालेला नाही.दौड येथुन खुप थोडा विसर्ग उजनीत येतो आहे,तर बंडगार्डन येथुन आणखी विसर्ग चालु झालाच नाही तर या उजनीच्या वरील बाजुस असणाऱ्या धरणापैकी जवळपास पाच धरणे प्लस 50 %च्या पुढे आहेत,त्यामुळे पावसाचा सांगितलेला अंदाज आणि या धरणाची स्थिती याचा विचार केला असता. 

परतीच्या पावसाने दणका दिल्यास पुढील काळात मोठ्या प्रमाणात पुरस्थिती लवकरच होण्याची शक्यता निर्माण होवु शकते.मात्र सध्यातरी उजनी धरण मोठ्या पावसाच्या व विसर्गाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

पुणे जिल्हा परिषद तसेच भिमाकोरे ते जोरदार पाऊस झाल्यानंतरच उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरते मात्र येथेही तुरळक प्रमाणात पाऊस होत असल्याने धरणात पाणी संथगतीने जमा होत आहे गत वर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही अशी शंका होती परंतु परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून झाली होती त्यामुळे उन्हाळ्यात पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कमी प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता.

दरम्यान उजनी जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत असताना मोठ्या प्रमाणावर जलपर्णीही दाखल होत असल्याने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये माशाऐवजी जलपर्णीच अडकत असल्याने मच्छीमार मात्र संकटात सापडले आहेत.

litsbros

Comment here