महाराष्ट्रराज्यसरकारनामा

राज्यातील व राज्या बाहेरील नागरिकांना ‘हे’ तीन दिवस तुळजापुरात प्रवेशबंदी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राज्यातील व राज्या बाहेरील नागरिकांना ‘हे’ तीन दिवस तुळजापुरात प्रवेशबंदी

 

कोजागिरी पर्णिमेनिमित्त तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरीता मोठयाप्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूरकडे पायी चालत जाण्याची परंपरा आहे. तथापी जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकर उस्मानाबाद यांच्याकडील आदेशान्वये कोजागिरी यात्रेचे आयोजन रदद करण्यात आले आहे.राज्यातील व राज्याबाहेरील सर्व नागरीकांना यात्रेकरीता दि.१८/१०/२०२१ ते दि.२०/१०/२०२१ दरम्यान जिल्हाबंदी करण्यात आली आहे.

उस्मानाबाद ते हैदराबादकडे जाणारी वाहतूक औसा, उमरगामार्गे हैदराबादकडे तर हैदराबादहून येणारी वाहने हैदराबाद, उमरगा, औसामार्गे जातील. हैदराबाद ते औरंगाबाद या मार्गावरील वाहतूक उमरगा, औसा, लातूर, अंबेजोगाई, मांजरसुंबा, बीडमार्गे औरंगाबादकडे जातील.

औरंगाबादहून येणारी वाहने औरंगाबाद, बीड, मांजरसुंबा, अंबेजोगाई, लातूर, औसा, उमरगामार्गे जाईल. उस्मानाबाद-सोलापूरकडे जाणारी वाहतूक वैरागमार्गे तर सोलापूरहून उस्मानाबादकडे जाणारी वाहतूक वैरागमार्गेच जाईल.लातूर ते सोलापूर या मार्गावरील वाहतूक मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी, सोलापूरमार्गे जाईल.

सोलापूर ते लातूर या मार्गावरील वाहतूक सोलापूर, बार्शी, येडशी, ढोकी, मुरुड, लातूरमार्गे जाणार आहे. औरंगाबाद-सोलापूरमार्गावरील वाहतूक सोलापूर, बार्शी, येरमाळामार्गे जाईल. दुसरीकडे तुळजापूर-सोलापूर ही वाहतूक मंगरूळपाटी, इटकळ, बोरामणी, सोलापूरमार्गे जाईल तर सोलापूर-तुळजापूर रोडवरील वाहने सोलापूर, बोरामणी, इटकळ, मंगरुळपाटी, तुळजापूर अशी जातील.

हेही वाचा – सकारात्मक बातमी; जगदीशब्द फाउंडेशनचा विधायक उपक्रम; कोरोनाने पालक गमावलेल्या सोगाव येथील बालकांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

‘या’ तारखेपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील प्रॅक्टिकलचे वर्ग होणार सुरू

तुळजापूर-बार्शी रोडवरील वाहने तुळजापूर, उस्मानाबाद, वैराग, बार्शी तर बार्शी-तुळजापूर रोडवरील वाहतूक बार्शी, वैराग, उस्मानाबाद, तुळजापूर अशी जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातून स्पष्ट केले आहे.

litsbros

Comment here