पारंपारिक वाद्याला आले सुगीचे दिवस

पारंपारिक वाद्याला आले सुगीचे दिवस

केत्तूर (अभय माने) राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगात आला आहे प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने उमेदवारांना मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करावी लागत आहे.244 करमाळा माढा मतदारसंघात 15 उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी खरा सामणा चौरंगी होत आहे. यामध्ये विद्यमान आमदार संजयमामा शिंदे हे पुन्हा एकदा अपक्ष,रामदास झोळ अपक्ष तर माजी आमदार नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), दिग्विजय बागल शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात होत असलला तरी गावागावात प्रचाराचा धुरळा उडाला आहे.

मुख्य असणाऱ्या गावागावात आठवडा बाजारा दिवशी किंवा इतर दिवशी प्रचार सभा करताना फटाक्यांच्या आतषबाजी बरोबरच पारंपारिक वाद्य हलगी, ढोल ताशाच्या कडाकडात उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचे गावामध्ये आगमन होत आहे तर काही ठिकाणी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी ही करण्यात येत आहे.

हेही वाचा – सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील करमाळा तालुक्यातील डिकसळ चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी

करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा दिग्गज साहित्यिकाच्या सोलापूर जिल्हा कार्यकार्रीणीत करमाळ्याचे पत्रकार दिनेश मडके यांची निवड

गावातील स्थानिक कार्यकर्ते त्यांच्या नेत्याचे उमेदवाराचे स्वागत दणक्यात करण्यासाठी आयोजन करीत आहेत त्यामुळे स्थानिक वाद्य वाजवणाऱ्यांना सुगीचे दिवस मात्र आले आहेत.उमेदवार मात्र या स्वागताने खुष होत आहेत.उमेदवारासह त्यांचे बरोबर आलेले कार्यकर्ते व स्थानिक कार्यकर्ते जोरदार प्रचार सभा घेत आहेत व एकमेकावर खालच्या पातळीवर, वैयक्तिक टीका टिप्पणी करीत आहेत.त्यामुळे सभेला उपस्थित असणाऱ्या मतदारांची मात्र एक प्रकारे क्रमणूक होत आहे.

karmalamadhanews24: