आम्ही साहित्यिकपुणेमहाराष्ट्र

***** तोंडाला सुटलंय पाणी *****

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

***** तोंडाला सुटलंय पाणी *****

सहज आपलं दुपारी आराम करीत पडलो होतो वाटलं आज त्याच्याकडे जावं कारण नुकतेच गावाकडनं तीन-चार पावणे मंडळी गणपती बघायसाठी आली होती कारण पुण्याचे गणपती जवळजवळ सगळीकडे प्रसिद्ध आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे पण सगळ्या देशात कोरोनानी थैमान घातलेलं होतं सगळी देवळं बंद होती समाजात वावरायची बंदी सगळे सण उत्सव एकदम बंद पण यावर्षी सगळे निर्बंध हटवल्यामुळे गणपती उत्सव आणि डेकोरेशन धुमधडाक्यात असं वाटतंय पण म्हणावा तेवढा उत्साह आणि हूरुप पण नाही आता काय करायचं

आता गौरीची सजावट हळद-कुंकू हा समारंभ झाल्यावर पाहुण्यांना घेऊन आम्ही मानाच्या अधिक दगडूशेठ व येताना लागणारे मोठे मंडळाचे गणपती बघून आलो आता बाहेर गेल्यावर जरा फिरुन पाय दुखल्यामुळे थोडीशी विश्रांती त्यातच मंडई परिसरात लागलेले फूड स्टॉल बघून तोंडाला पाणी आपोआप सुटतं जिभेच्या खाली असणाऱ्या पाचक रसाच्या ग्रंथी पाझरायला लागतात मग काय आम्ही लोकांनी तेथेच आपापल्या आवडीनुसार पदार्थांवर ताव मारला पण घरी आल्यावर लक्षात आलं तिथं खाल्ल्यालं आपण घरी केलं असतं तर पुरवणी आलं असतं इथं आपलं कवा पण अर्थशास्त्र जागं होतं मग काय झालं पाहुणेमंडळी पण होती नाही तरी भाजी बाजारात गेल्यावर डोकं नुसतं हँग होतयं माणूस एका वेगळ्या वळणावर येऊन थांबतोयं सगळी विचाराची चक्र थांबल्यासारखी होतात कोणती भाजी घ्यावी डोक्यात किडे पडल्यावानी मग आम्ही ठरवलं भाजी वगैरे काही नाही त्याला लागणाऱ्या दोन-चार जिनसा घेतल्या व पावभाजी करायचं पक्क ठरलं पलीकडच्या कोपऱ्यावरच्या बेकरीतल्या भट्टीचा सुवास नाक येडं करून सोडायचा पावलं आपोआप बेकरीकडे वळायची एखादा ब्रेड खारी टोस्ट घेतल्याशिवाय कोणी पण पुढे जायची रिस्क घेत नव्हतं आम्हाला पावाच्या चार लाद्या आणि अमूल बटर घ्यायचं होतं पाहुण्याच्या पोराला नानकटाई आवडायची म्हणून ती पण जोडीला घेतली बाजार करून घरी आलो.


आता बघा मला बाहेर गेल्यावर आणि माझ्या जिभेला शक्यतो बाहेरचं खायची चटक आणि त्यातल्या त्यात पाणीपुरी रगडा पॅटीस असं खाद्य म्हणजे बघा पाणीपुरी मध्ये नुसता अन्नपदार्थ कमी पाणी जास्त त्यामुळे पाण्यानेच नुसतं पोट भरतयं पण रगडा पुरीमधी किंवा रगडा पॅटीस मध्ये दणकून पोट भरतयं तसेच पाणीपुरी नंतर माझ्या आवडीचा पदार्थ म्हणजे पाव भाजी त्याचं काय झालं दोन कांदे असतील तर एखादा कांदा चिरायचा एक सारखा मोगऱ्याच्या पाकळ्या सारखा ढिगारा करायचा त्याच्या जोडीला टोमॅटो पण अगदी तसंच त्याच अंतरावर नंतर आलं लसूण वगैरे उग्र मंडळींना त्या उरलेल्या एका कांद्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं नंतर चांगलं वाटण करून ठेवायचं जोडीला दोन काश्मिरी लाल मिरच्या पावभाजीला पावभाजीचा रंग येण्यासाठी पण रंग न घालण्यासाठी फ्लावर चे पांढरे शुभ्र तुरे सिमला मिरचीचे करकरीत पुन्हा एक सारखे बारीक चिरलेले तुकडे बटाटे आणि टपोरे हिरवे कंच मटार सगळं कसं एकत्र प्रेशर कुकरमध्ये त्या कुकरमध्ये सगळ्यांचा ताठा आणि रुबाब आणि अहंपणा सगळं कसं एका शिट्टीत जिरतं आणि सगळे एकजीव होतात ही सगळी तयारी झाली की खऱ्या पूजेला सुरुवात थोडसं तेल हवं तेवढं बटर हौसेला मोल नाही चवीला तर नाहीच नाही म्हणून हवं तेवढं पहिला मान उग्र मंडळींचा आलं लसूण कांदा काश्मिरी मिरची चॅर्रर्रर्र आवाज झालाच पाहिजे नाहीतर पाप लागतं म्हणतात या उग्र मंडळींचा अहंपणा असाच नाहीसा करावा लागतो बटरमध्ये परतून परतून त्यांना पुढे येणाऱ्या मंडळीशी जमवून घेता आलं पाहिजे त्या योग्यतेचं करायचं आलं,लसणीने बाकीच्या भाज्यांशी फटकून वागता कामा नये गंध लावल्यासारखा हिंग आणि कसुरी मेथी त्यातच आत्ताशी कुठं दरवाजापर्यंत वास पोहोचलेला असतो.

हेही वाचा – करमाळा तालुक्यात घोणस सदृश्य विषारी अळीचे आक्रमण :शेतकऱ्यात घबराटीचे वातावरण, कोणत्या पिकावर येते ही अळी? कशी ओळखावी ही अळी.? काय काळजी घ्यावी.? वाचा सविस्तर!

माजी आमदार पाटील यांची आदिनाथ कारखान्याला भेट, यंत्रसामग्रीची पाहणी व पूजन; आदिनाथ सुस्थितीत आणण्याचा विश्वास केला व्यक्त

मग उरलेला कांदा टोमॅटो घालायचा ही मंडळी तशी कोणाशीही जुळवून घेणारी कुठेही सहज रमणारी पुन्हा एकदा परतायचं आणि आता सगळाच लाल रंग आणि कढईच्या बाजूने बटरच अस्तित्व जाणवायला लागलं की इवलीशी हळद हवं तेवढं तिखट आणि पावभाजी मसाला तो एवरेस्ट चा नसेल तर उगीचच मनाला चुटपुट लागून राहते इथपर्यंत पोहोचलो की सिमला मिरची समरस व्हायला तयारच असते त्यांना हलकेच आत ढकलायचं तशी ती मिळून मिसळून वागणारी असते आपली थोडीशी मदत म्हणून स्मॅशर नाहीतर ब्लेंडर फिरवायचा पण उगाच किंचित नाही तर पिठलं व्हायचं शेवटी मीठ टाकून कोथिंबिरीची मुबलक पेरणी करायची अशी भाजी मुरायला ठेवल्यावाणी झाकण ठेवून पाच मिनिटे तिला मुरू द्यायचं व आचं बंद करायची एवढ्यात त्या मजल्यावर कळालेलं असतं आमच्याकडे पावभाजी आहे म्हणून मग एकीकडे पाव भाजायला घ्यायचे पुन्हा हवं तेवढं बटर बारीक चिरलेला कांदा बटर लिंबाच्या फोडी पुन्हा वर प्लेटमध्ये कोथिंबीरची पेरणी तोंडाला नुसतं पाणी सुटते मुंबईमध्ये मिल कामगाराला स्वस्तात भरपेट खायला मिळावं म्हणून पावभाजी प्रचलित झाली पाव भाजताना तव्यावर बटरमध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकला तर अहाहा sss…
………………………………………………….
किरण बेंद्रे
पुणे… दि.09 ऑगस्ट 2022
7218439002

litsbros

Comment here