माढासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

थोर महापुरुषांचे विचार व कार्यातून आजच्या युवा पिढीने प्रेरणा घ्यावी: विठ्ठलवाडीत जिजाऊ, विवेकानंद जयंतीत गुंड यांचे प्रतिपाद

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

थोर महापुरुषांचे विचार व कार्यातून आजच्या युवा पिढीने प्रेरणा घ्यावी: विठ्ठलवाडीत जिजाऊ, विवेकानंद जयंतीत गुंड यांचे प्रतिपाद

माढा / प्रतिनिधी – आज मोबाईल, टीव्ही,संगणक,इंटरनेट,फेसबुक आदी मनोरंजनाच्या माध्यमांमुळे वाचन संस्कृती कमी होत आहे.आजच्या पिढीतील अनेकांचा कल व्यसनाधीनतेकडे झुकत आहे.शिक्षक आणि वडिलधाऱ्या मंडळींचा पूर्वीप्रमाणे धाक व आदरयुक्त भिंती युवा पिढीला वाटत नाही त्यामुळे संस्कार व शिस्त अपुरी पडत आहे. आजचा युवक हा देशाचा भावी आधारस्तंभ आहे तो संस्कारक्षम व सर्वगुणसंपन्न बनावा याकरिता थोर महापुरुषांचे विचार व कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले आहे.

ते विठ्ठलवाडी ता.माढा येथील श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करताना 12 जानेवारी रोजी बोलत होते.
अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र भांगे होते.

सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन माजी सरपंच बालाजी गव्हाणे व दूध संस्थेचे चेअरमन हनुमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक वाचनालयाचे सचिव नेताजी उबाळे यांनी केले.

यावेळी पतसंस्थेचे मॅनेजर भिमराव नागटिळक म्हणाले की, आज थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने लोकवर्गणी जमा केली जाते परंतु त्याचा सदुपयोग न होता ढोल, ताशा,फटाके,हार-तुरे,खाणे-पिणे, सवाद्य मिरवणुकीवर खर्च केला जातो परंतु त्याऐवजी या विशेष दिनी प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करणे गरजेचे आहे जेणेकरून युवा पिढीला संस्काराची व विचारांची शिदोरी मिळेल.आज समाजातील वडीलधारी मंडळींचा आदर्श कमी होत आहे त्यामुळे काही युवक व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – माढ्यात वरिष्ठ दिवाणी न्यायालय आणि पद निर्मितीस मंत्रिमंडळाची मंजूरी -आमदार बबनदादा शिंदे महत्वपूर्ण मागणीची आ.बबनदादा शिंदे यांच्याकडून पूर्तता झाल्याने समाधान व्यक्त

सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर वीस नव्या सदस्यांची निवड; भाजप 14 तर शिंदे सेनेच्या सहा जणांना संधी, करमाळा तालुक्यातील ‘या’ दोघांचा समावेश

माजी सरपंच बालाजी गव्हाणे,दूध संस्थेचे चेअरमन हनुमंत पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे, सचिन नेताजी उबाळे,धनाजी सस्ते, भिमराव नागटिळक,नेताजी कदम, सौदागर गव्हाणे,मेजर बालाजी कदम, कैलास सस्ते,सतीश गुंड,शिवाजी कोकाटे,सत्यवान शिंगाडे,धनाजी भांगे,सतीश शेंडगे,कैलास खैरे,शंकर जाधव,सज्जन मुळे,सदाशिव दळवी, शिवाजी जाधव,पांडुरंग खांडेकर, संदीप मुळे,दिनेश कदम,ग्रंथपाल अमोल जाधव,रवींद्र शेंडगे,शिवाजी खरात यांच्यासह ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.

litsbros

Comment here