राजकीय वातावरण तापले : राजकीय चर्चांना ऊत

राजकीय वातावरण तापले : राजकीय चर्चांना ऊत

केत्तूर (अभय माने) 244, करमाळा माढा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ग्रामीण भागात पारावरच्या गप्पांना ऊत आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी थंडी सुरू होत असताना होत असताना तापली आहे.

करमाळा माढा मतदार संघात हवा कुणाची ? माढा तालुक्यातील 36 गावे कोणत्या उमेदवाराकडे झुकणार ?करमाळा तालुक्यातून कोणता उमेदवार किती मताधिक्य मिळवणार ? याबाबत सोशल मीडियावर गुणगान तसेच हमरी तुमरीही होत आहे.

मध्यंतरी राज्यांमध्ये झालेल्या पक्ष फोडीच्या राजकारणाचा मुद्दा तसेच 2014 व कोरोना काळातील विकास कामे या मुद्द्यानी यामुळे प्रचार सभा गाजत आहेत.जुन्या फिरणाऱ्या व्हिडिओमुळे हसावे की रडावे तेच समजत नाही तर पक्षाशी कोणता उमेदवार एकनिष्ठ आहे का ? निवडणुकीनंतरही एकनिष्ठ राहणार का ? जरांगे फॅक्टर तालुक्यामध्ये काय करामत करणार ? यावरही जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचा – खतरनाक फ्रॉड..! तुमच्याच बँक खात्यात पैसे पाठवून अशा प्रकारे तुमचीही होऊ शकते फसवणूक!

महाफीड कंपनीकडून संगम शाळेस रंगरंगोटी व बोलक्या भिंती करण्यासाठी मदतनिधी

मतदान तारीखजवळ येत असल्याने छोटे मोठे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. विकास कामांचे साक्षीदार व्हा. विकास कामाच्या पाठीमागे ठाम रहा.असे आवाहन केले जात आहे निवडणुकीमुळे राजकीय वातावरण मात्र तापले आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line