उद्या माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार

*उद्या माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार ?*

केत्तूर (अभय माने) 244 करमाळा विधानसभेसाठी अर्ज भरले गेले आहेत.4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीनंतर खरे लढाईचे चित्र समोर येणार आहे. तरीही विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यावर्षीही अपक्ष म्हणूनच मतदारासमोर जात आहेत तर माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश घेतला व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्यांना उमेदवारीही दिली आहे.

तर रश्मी बागल यांचे बंधू दिग्विजय बागल हे शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपात गेले होते परंतु शिवसेना शिंदे गटाने त्यांना उमेदवारी दिली आहे तर दत्तकला शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा रामदास झोळ मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांके यांच्या संपर्कात असून मनोज जरांगे यांचे मार्फत ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत प्रत्यक्षदर्शी यांच्यातच चौरंगी सामना रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – प्रवासी सेवा संघाकडून विविध मागण्यांचे निवेदन:नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासह इतर मागण्या

महाफीड कंपनीकडून संगम शाळेस रंगरंगोटी व बोलक्या भिंती करण्यासाठी मदतनिधी

अद्यापपर्यंत जाहीर प्रचार सुरू झाला नसला तरी दिवाळी झाल्यानंतरच प्रचाराचे फटाके फुटणार असून सध्या आपल्या समर्थक उमेदवारांची मात्र सोशल मीडियावर प्रचारात राळ उडवली जात आहे.राजकारणापासून सक्रिय नसणारे काका, दादा,सर,मामा,भाऊ,आबा ही मंडळी ऍक्टिव्ह झाली आहेत जो तो आपलाच नेता कसा श्रेष्ठ ? हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जुने व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.मतदारसंघाच्या विकासाची अनेक जुनी नवे वायदे केले जात आहेत. काही ठिकाणी कार्यकर्ते हमरी तुमरीवर येऊ लागले आहेत.अशा ग्रुप वर पोलीस प्रशासनाने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण होत आहे.

karmalamadhanews24: