करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

 केत्तूर (अभय माने) परतीच्या पावसाचा मुक्काम 24 ऑक्टोबरपर्यंत वाढला असून अरबी समुद्रात व बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार तयार झाल्याने हा मुक्काम वाढल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केत्तूरसह पारेवाडी,वाशिंबे,गोयेगाव,जिंती,टाकळी हिंगणी ,दिवेगव्हाण रविवारी रात्री रात्रभर पावसाने हजेरी लावली तर सोमवार (ता. 21) रोजी सकाळपासूनच दमदार पावसाने सुरुवात केली ब्रेक के बाद हा पाऊस दिवसभर पडत होता. या पावसाने सखल भागात पाणी वाहिले तर जागोजागी पाण्याची डबकी तयार झाली.या पावसामुळे ऑक्टोबर हिटच्या उष्णतेला ब्रेक लागला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.पावसामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे मात्र हाल झाले.

वारंवार पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर चिखल तसेच घाण साचल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था जलजीवन कामामुळे अत्यंत वाईट झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याचा निचरा करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा – कामे न करता फक्त पैसा व मनोरंजनाच्या जोरावर आमदार होता येते हा विरोधकांचा गैरसमज – आ. बबनदादा शिंदे वडाचीवाडी (अं.उ) येथे शेतकरी मेळावा व वचनपूर्ती सोहळा संपन्न

श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम येथे आगळा वेगळा नऊ दिवस स्त्री जागर नवदुर्गांचा हा कार्यक्रम संपन्न

सतत पडणाऱ्या पावसामुळे काढणीस आलेल्या कांदा पिकात पाणी साचून राहिल्याने कांद्यास कांदा चढण्याचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे कांदा उत्पादक मात्र हवालदिल झाले आहेत.गेल्या काही दिवसात परतीच्या पावसाने परिसरात चांगली हजेरी लावली आहे.


 

karmalamadhanews24: