श्री नंदिकेश्वर विद्यालयामध्ये गुणवंत खेळाडू व क्रीडाशिक्षक यांचा सत्कार समारंभ संपन्न
माढा प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या,श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक मध्ये जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये उत्तुंग यश संपादन केलेल्या तसेच प्रवरानगर,अहमदनगर येथे होणाऱ्या पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यालयाच्या सर्व गुणवंत खेळाडू विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माढा शाखेचे शाखाधिकारी प्रसाद कदम साहेब,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माढा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक (API नेताजी बंडगर साहेब,प्रमुख उपस्थिती स्कूल कमिटी सदस्य श्री भारत (आप्पा) घाडगे, उपळाई बुद्रुकचे माजी सरपंच मनोहर (आबा) गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ देशमुख साहेब यांनी केले.
जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये उत्तुंग यश संपादन केलेल्या तसेच प्रवरानगर,अहमदनगर येथे होणाऱ्या पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यालयाच्या सर्व गुणवंत खेळाडू विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या शुभहस्ते अभिनंदनपर सत्कार करण्यात आला तसेच शालेउपयोगी वह्या व गुलाब पुष्प देऊन समारंभ पूर्वक बक्षीस वितरण करण्यात आले. या सर्व विद्यार्थिनींना अनमोल असे मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक शब्बीर तांबोळी सर यांचा अभिनंदनपर सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नेताजी बंडगर साहेब म्हणाले,विद्यालयाने क्रीडा संस्कृती चांगली जोपासली आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रसाद कदम साहेब म्हणाले,ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी मिळवलेले यश अतिशय उल्लेखनीय आहे. जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उत्तुंग यश मिळवलेल्या तसेच पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थिनींना खेळाचे किट मोफत देण्याचे त्यांनी जाहीर केले.
श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी ओझोन आणि जागतिक हवामान बदल या विषयावर व्याख्यान संपन्न
यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री निचळ साहेब,सेवानिवृत्त शिक्षक श्री रामचंद्र माळी सर,दैनिक सकाळचे पत्रकार श्री गणेश गुंड सर,श्री संतोष वागज,पोलीस कॉन्स्टेबल श्री संकेत मस्के,श्री प्रकाश फरतडे,श्री श्रीकांत शेंडगे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री शब्बीर तांबोळी सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु.अमृता पाटील या विद्यार्थिनीने मानले.