टेंभुर्णी येथे शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

टेंभुर्णी येथे शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

उपळवटे प्रतिनिधी संदीप घोरपडे

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे
महाराष्ट्रराज्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आले होतं राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस च्या वतीने हे रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते ह्यामध्ये टेंभुर्णी येथील 47 नागरिकांनी रक्तदान करून सहकार्य केले आहे.

या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी विध्यार्थी काॅग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्ष सागर पडगळ यांच्या हस्ते करण्यात आले होते या शिबिराच्या कार्यक्रमाला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मयूर निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माढा तालुका अध्यक्ष औदुंबर भाऊ महाडिक युवासेना टेंभूर्णी शहर प्रमुख जीवन राऊत शिवसेना टेंभुर्णी शहर प्रमुख सुरेश भाऊ लोंढे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे माढा तालुका प्रमुख मधुकर आण्णा देशमुख टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य वैभव भैय्या महाडिक संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रवक्ते विशाल इंदलकर चव्हाणवाडी विद्यमान सरपंच नवनाथ शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते व ह्या शिबिरामध्ये तालुका लेवल ची पद वाटप कार्यक्रम ही पार पडला आहे.


हे शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी विध्यार्थी काॅग्रेस नितीन सावंत पाटील पवन टेकाळे सागर टेके सचिन सावंत पाटील सोलापूर जिल्हा विज्ञान प्रमुख तेजस्विनी साळुंके नितीन सोनवणे इत्यादींनी परिश्रम घेतले राज्याचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पदे वाटप करण्यात आली आहेत.

हेही वाचा – सातोली येथे उसाचा ट्रॅक्टर शेतातून नेण्यावरून पिता-पुत्राला मारहाण करत खिशातील रक्कम घेतली काढून; करमाळा पोलिसात १० जणांवर गुन्हा दाखल

मांगी तलाव संदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक ‘या’ तारखेपर्यंत तलाव कुकडी प्रकल्पात विलीनकरणं बाबत अहवाल येणार : गणेश चिवटे यांची माहिती

आकाश खंदारे -तालुका उपाध्यक्ष
शरद लहू देवकुळे-मुख्य सरचिटणीस
रणजित मलका नाईकनवरे – ग्राम अध्यक्ष ज्ञानेश्वर शिवाजी देवकुळे – उपग्राम अध्यक्ष
विश्वजित नागनाथ काशीद – प्रसिद्धी प्रमुख
सागर सुनील धडस -संघटक
स्वप्नील भास्कर बारकुंड – सरचिटणीस तुळशी आनंद तांदळे माढा तालुका महिला ग्रामीण इत्यादी पदे वाटप करण्यात आली आहेत.

karmalamadhanews24: