माढा सोलापूर जिल्हा

टेंभुर्णीत बबनदादावरील शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी महामृत्युंजय महाअभिषेक भाविकभक्त व वारकऱ्यांना दोन टन खिचडीचे वाटप ; सुमारे 50 ते 60 जणांनी घेतला लाभ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

टेंभुर्णीत बबनदादावरील शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी महामृत्युंजय महाअभिषेक

भाविकभक्त व वारकऱ्यांना दोन टन खिचडीचे वाटप ; सुमारे 50 ते 60 जणांनी घेतला लाभ

माढा/प्रतिनिधी- संयोजक विजयदादा खटके व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडूनाना ढवळे आणि शिंदे परिवार यांचे सहकार्यातून वारीच्या व परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्यांना खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले.सुमारे 50 ते 60 हजार वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला.पंढरपूरच्या मार्गावर असणाऱ्या सर्व विठ्ठलभक्त वारकऱ्यांसाठी ही सोय करण्यात आली होती. मागील 5 वर्षापासून प्रतिष्ठान हा उपक्रम राबवित आहे पंढरपूरकडे जात असताना बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांची सोय होते परंतु परतीच्या मार्गावर ही विठ्ठल भक्तांची फराळाची सोय होणे गरजेचे आहे.या उद्देशाने हा विधायक व रचनात्मक उपक्रम चालू केलेला असून दोन टन साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

यावेळी माढा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार बबनरावजी शिंदे हे हृदय शस्त्रक्रियेसाठी अमेरिका येथे गेले आहेत त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी व त्यांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी महामृत्युंजय महाभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वैशाली पाटील व दिपक पाटील,सविता लोंढे व श्रीकांत लोंढे,कल्पना देशमुख व दादासाहेब देशमुख,दिपाली खटके व विजय खटके,स्वाती चव्हाण व हनुमंत चव्हाण या 5 दाम्पत्यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणीची पुजा करुन महाभिषेक केला.बेंबळेचे ऋषिकेश जोशी यांनी पौरोहित्य केले.

यावेळी माढा तालुक्यातील आदरणीय दादांवर प्रेम करणारे नेतेमंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मोबाईल वरून व्हिडिओ कॉलद्वारे आदरणीय बबनदादांनी ही सर्वांशी संवाद साधला.यावेळी सर्व कार्यकर्ते भावनिक झाले होते.दादांनी महाअभिषेका साठी बसलेल्या दांपत्यांचे आभार मानून सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडूनाना ढवळे यांनी केले.

यावेळी उपसभापती सुहास पाटील,मार्केट कमिटीचे संचालक दिलीपराव भोसले, शिवाजीराव पाटील-चांदजकर, शंभुराजे मोरे,सचिन होदाडे, गणेश काशीद,गोरख देशमुख व उपाध्यक्ष वामनभाऊ उबाळे यांनी मनोगतातून बबनदादांच्या उत्तम आरोग्याची कामना व्यक्त करीत पांडुरंगाकडे साकडे घातले.

यावेळी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन वामनभाऊ उबाळे,संचालक निलकंठ पाटील,माढेश्वरी बँकेचे व्हा.चेअरमन अशोकशेठ लुणावत,माढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडूनाना ढवळे,मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे,शिव विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खटके,जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील,आप्पासाहेब उबाळे,माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद,डॉ.गोरख देशमुख,राजेंद्र पाटील,अमित पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे, अजितसिंह देशमुख,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,सज्जनराव जाधव,सरपंच तानाजी लांडगे, सरपंच अशोक शिंदे,शिवाजी बारबोले,

हेही वाचा – मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न;नाशिक जिल्ह्यातील ‘ या ‘ दांपत्याला मिळाला शासकीय पूजेचा मान

बबनदादावरील शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी पांडुरंगाला साकडे घालणार – हभप महंत प्रभाकर शास्त्री महाराज माढेश्वरी अर्बन बँकेच्या वतीने श्री संत ज्ञानराज माऊलींच्या पालखीचे स्वागत व पूजन ; 300 रेनकोटचे वारकऱ्यांना वाटप

प्रदिप चौगुले,कैलास तोडकरी,विठ्ठल मुकणे,कुमार शिंदे,संदीप पाटील,रमेश येवले- पाटील,वेताळ जाधव,विष्णू हुंबे,लक्ष्मण खुपसे,शिवाजी डोके,भरत चंदनकर,पांडुरंग घाडगे,रमाकांत कुलकर्णी, अशोक मिस्कीन,श्रीकांत कोरे, नागाभाऊ खटके,दिलीपराव भोसले,रमेश पाटील,नागेश खटके,रामभाऊ शिंदे,सर्जेराव बागल,श्रीकांत लोंढे,लक्ष्मण शिंदे,शिवाजी पाटील,रोहित देशमुख,संतोष खटके,रवींद्र श्रीखंडे,दादासाहेब देशमुख, सचिन होदाडे,विनायक चौगुले, अमोल देवकर,रामभाऊ वाघमारे,धनंजय मोरे,सतीश चांदगुडे,गणेश पोळ,संतोष वाघमारे,बंडू सोनटक्के, संतोष पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी,गावोगावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, माढेश्वरी अर्बन बँकेचे संचालक, मार्केट कमिटीचे संचालक, सोसायटीचे चेअरमन व संचालक यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आभार नागेश खटके-पाटील यांनी मानले.सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!