देश/विदेशमनोरंजन

लवकरच येणार नवीन वाय-फाय टेक्नोलॉजी, १ किमीपर्यंत असेल रेंज; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लवकरच येणार नवीन वाय-फाय टेक्नोलॉजी, १ किमीपर्यंत असेल रेंज; वाचा सविस्तर

स्मार्टफोन, स्मार्ट डिव्हाइसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे सर्व डिव्हाइस वापरण्यासाठी मजबूत कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. त्यामुळे वाय-फायची रेंज देखील जास्त असणे गरेजेचे आहे. आता लवकरच नवीन वाय-फाय टेक्नोलॉजी येण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, वाय-फाय एलायन्सद्वारे एका नवीन वाय-फाय टेक्नोलॉजीवर काम केले जात असून, याला Wi-Fi HaLow म्हटले जात आहे. याची रेंज १ किमीपर्यंत असेल.

नवीन हाय-फाय टेक्नोलॉजीला Wi-Fi HaLow म्हटले जात आहे. या टेक्नोलॉजीला इंटरनेट ऑफ थिंग्सवर फोकसकरून तयार केले जात आहे. याचा वापर प्रामुख्याने औद्योगिक, कृषी, स्मार्ट बिल्टिंग आणि स्मार्ट सिटीच्या उपयोगासाठी केला जाईल.

वाय-फाय एलायन्सचा दावा आहे की, वाय-फाय हेलो हे वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी अधिक व्यापक दृष्टीकोण आहे. याची रेंज जवळपास १ किमीपर्यंत असेल. याद्वारे अधिक मजबूत कनेक्शन प्रदान केले जाईल. टेक्नोलॉजी इंटरनेट ऑफ थिंग्स इनबिल्ड डिव्हाइससाटी लो पॉवर, हाय परफॉर्मेंस आणि अधिक सुरक्षित वाय-फाय प्रदान करेल.

सध्याची वाय-फाय टेक्नोलॉजी बँडविथच्या बाबतीत २.४ Ghz ते ५ Ghz स्पेक्ट्रमवर काम करत आहे. दुसरीकडे वाय-फाय हेलोला १ Ghz पेक्षा कमी स्पेक्ट्रमवर काम करण्यासाठी

 

विकसित केले आहे. यामुळे वीजेचा वापर कमी होईल. तसेच, लो फ्रिक्वेंसीमुळे जास्त अंतरावर डेटा ट्रांसफर होईल. याचा डेटा स्पीड कमी असण्याची शक्यता आहे, कारण स्पेक्ट्रम देखील कमी आहे. मात्र, IoT डिव्हाइस आणि प्रोडक्ट्ससाठी अल्ट्रा-फास्ट वाय-फाय स्पीडची गरज नसते व कमी डेटामध्ये देखील ते व्यवस्थित काम करतात.

Wi-Fi HaLow कधीपर्यंत लाँच होणार याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. वाय-फाय एलायन्सने म्हटले होते की, २०२१ च्या चौथ्या तिमाहीत डिव्हाइस सर्टिफिकेशन सुरू केले जाऊ शकते. म्हणजेच, टेक्नोलॉजीचा उपयोग पुढील वर्षीपासून करता येऊ शकतो.

 

litsbros

Comment here