शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हे कर्मवीरांनी ओळखले_डॉ.अभय लुणावत

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हे कर्मवीरांनी ओळखले_डॉ.अभय लुणावत

माढा प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 137 वा जयंती सोहळा उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.कर्मवीर जयंतीनिमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्ताने सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ॲड.मा.श्री बाळासाहेब पाटील साहेब,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.डॉ.श्री अभय लुणावत साहेब तर प्रमुख वक्ते रयत सेवक को-ऑप.बँक जि.सातारा चे माजी चेअरमन मा.श्री आप्पासाहेब पाटील साहेब उपस्थित होते.

*पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व रयतमाऊली सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कर्मवीर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धांच्या तीन दालनांचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दशरथ देशमुख साहेब यांनी शाखेचा इतिहास व आजपर्यंतची शाळेची वाटचाल याचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला.

इ.10 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचे व कर्मवीर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यालयाच्या 24 खेळाडूंना मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या सर्व खेळाडूंना अनमोल मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री शब्बीर तांबोळी सर यांना उत्कृष्ट क्रीडाशिक्षक म्हणून सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ॲड.मा.श्री बाळासाहेब पाटील म्हणाले,कर्मवीर म्हणजे ज्ञानगंगा खेड्यापर्यंत पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आहेत.व्याख्याते न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्यु.कॉलेज (सायन्स) घोटी चे माजी प्राचार्य मा.श्री आप्पासाहेब पाटील साहेब म्हणाले,कर्मवीरांनी आयुष्यभर शिक्षण हेच कर्म व समाजसेवा हाच धर्म मानला.साई हॉस्पिटल माढा चे मा.डॉ.श्री अभय लुणावत साहेब म्हणाले,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हे कर्मवीरांनी ओळखले होते.कर्मवीरांनी ज्ञानगंगा खेड्यापर्यंत पोहोचवली.गावातील दर्जेदार अधिकारी घडविण्यात रयत शिक्षण संस्थेच्या श्री नंदिकेश्वर विद्यालयाचा मोठा वाटा आहे.

हेही वाचा – तब्बल चाळीस वर्षा नंतर केत्तूर नं २ येथे येणाऱ्या एसटी बस पाटीचे नामकरण

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयाच्या 24 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

याप्रसंगी स्कूल कमिटी सदस्य श्री कृष्णा घाडगे,ॲड.श्री नानासाहेब शेंडे,उपळाई बुद्रुक च्या सरपंच सौ.सुमनताई माळी मॅडम,उपळाई बुद्रुकचे माजी सरपंच श्री मनोहर गायकवाड,श्री धनंजय बेडगे,श्री अजितसिंह देशमुख साहेब,श्री नागनाथ दसंगे, सेवानिवृत्त शिक्षक श्री अब्दुलरहीम पठाण सर,श्री शिवाजी लोंढे सर व श्री रामचंद्र माळी सर, श्रीम.शशिकला नकाते, पोस्टमास्तर मनोजकुमार शेटे,श्री विनोद वाकडे,दै.सकाळचे पत्रकार श्री गणेश गुंड,श्री सोमेश्वर शेंडे,श्री कुबेर गायकवाड,श्री विनोद गाडेकर,श्री पिंटू माळी,श्री वैभव गोरे,सौ.साधनाताई आखाडे,श्री जमीर आतार,सौ.माधवीताई शिंदे,श्री सिद्धेश्वर शिंदे,श्री शहाजी शिंदे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी तसेच उपळाई बुद्रुक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.श्री शब्बीर तांबोळी सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.

karmalamadhanews24: