शिक्षकांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार स्वतःच्या क्षमता वृद्धिंगत कराव्यात- विकास यादव
माढा तालुकास्तरीय शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षणात केले आवाहन
माढा/प्रतिनिधी-राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 च्या अनुषंगाने शिक्षणामध्ये नवनवीन बदल,तंत्रज्ञान, कौशल्ये व ध्येयधोरणे समाविष्ट होत आहेत.त्यामध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा,शालेय शिक्षण पायाभूत स्तर,समग्र प्रगतीपत्रक,क्षमता आधारित मूल्यांकन,अध्ययन-अध्यापन प्रक्रिया,मूल्यांकनाची कार्यनीती,प्रश्न निर्मितीचे प्रकार, प्रश्न निर्मिती कौशल्ये, उच्चस्तरीय विचारप्रवर्तक प्रश्न,शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अर्थात स्कॉफ या सर्व बाबींची अद्ययावत माहिती प्रत्येक मुख्याध्यापक व शिक्षकांनी आत्मसात करून स्वतःच्या सर्व प्रकारच्या क्षमता वृद्धिंगत कराव्यात असे आवाहन कुर्डूवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी केले आहे.
ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर व कुर्डूवाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माढा तालुकास्तरीय शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना तुळजाभवानी अध्यापक विद्यालयात बोलत होते.प्रास्ताविक प्रशिक्षण समन्वयक अंकुश पांचाळ यांनी केले.
पुढे बोलताना गटशिक्षणाधिकारी यादव यांनी सांगितले की,शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता व भौतिक सुविधा वाढीसाठी योगदान दिले पाहिजे,शालेय पोषण आहारासंदर्भात योग्य ती खबरदारी घेऊन माहिती वेळेत सादर केली पाहिजे.समितीने अधिकाराबरोबरच कर्तव्याचेही भान ठेवले पाहिजे.प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अर्थात स्कॉफ ची 128 मानके 31 मार्चपूर्वी सर्व अचूक पुराव्यासह भरणे आवश्यक आहे.माहिती भरताना काही तांत्रिक अडचणी असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रशिक्षण समन्वयक महादेव सोनवणे, सुभाष राऊत,अंकुश पांचाळ,सुभाष राऊत,तज्ञ मार्गदर्शक सुहास जोशी,विनोद परिचारक, अजित दावणे,सोमनाथ कांबळे,संजय काशीद, राहुल कांबळे,समाधान कोळी,बालाजी ढेंबरे, संपत लेंडवे,मुख्याध्यापक हनुमंत खापरे,लहू लोंढे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,ज्ञानेश्वर जाधव,छाया राऊत,अमिता शेटे,ऐश्वर्या जाधव,प्रविण लटके,तुकाराम कापसे,महेश नागटिळक,सुनील खोत,तनुजा तांबोळी,प्रतिभा पांडव,त्रिशला साळुंखे,शुभांगी कदम,विष्णू शेंडगे,सचिन बोराडे,सतीश बोंगाळे,आबा फंड यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.आभार समन्वयक अंकुश पांचाळ यांनी मानले.
फोटो ओळी- माढा तालुकास्तरीय शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी विकास यादव समोर मुख्याध्यापक व शिक्षकवृंद.