ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तारापूर एमआयडीसीमध्ये अग्नीतांडव, केमिकल कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तारापूर एमआयडीसीमध्ये अग्नीतांडव, केमिकल कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण 

बोईसर : बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्रीमियर इंटरमीडिय टस या केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ पसरले असून, स्थानिक रहिवाशांमध्येही हाहाकार उडाला आहे. कंपनीला लागलेल्या आगीमुळे एकापाठोपाठ एक 8 मोठं मोठे स्फोट झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट झाले नाही. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग आटोक्यात येत नसल्यामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणात होण्याची भीती अग्नीशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
ज्वलनशील पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याने आगीचा भडका उडाल्याचा अंदाज
पालघर जिल्ह्यातील तारापुर एमआयडीसीमध्ये अलिकडच्या काळात आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

दोन महिन्यांपूर्वीही येथील एका केमिकल प्लांटला भीषण आग लागून परिसरात मोठा हलकल्लोळ माजला होता. ती घटना ताजी असतानाच आज, मंगळवारी रात्री आणखी एक केमिकल कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे. या आगीचे स्वरुप भीषण असून त्यावर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान अग्निशमन दलाच्या जवानांपुढे आहे. स्थानिक पालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा तसेच स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कंपनीत ज्वलनशील पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याने आगीचा प्रचंड भडका उडाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

litsbros

Comment here