Uncategorizedमनोरंजनमहाराष्ट्र

तमाशा क्षेत्रातील अप्सरा काळाच्या पडद्याआड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तमाशा क्षेत्रातील अप्सरा काळाच्या पडद्याआड

उपळवटे (प्रतिनिधी)
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई तुकाराम खेडकर -सातारकर (वय 82)यांचे आज संगमनेर येथे राहत्या घरी निधन झाले कोरोना च्या विळख्यात सापडलेल्या कांताबाई यांनी आखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने लोककलेची खुप मोठी हानी झाली आहे.

कांताबाई सातारकर या प्रसिध्द तमाशा कलावंत रघुविर खेडकर यांच्या त्या मातोश्री होत्या जन्म 15 ऑक्टोबर 1939 गुजरात मधील बडोदा जिल्ह्यातील टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाय्रा साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्यापोटी कांताबाई चा जन्म झाला त्यांच्या कुटुंबात तमाशा नव्हता तसेच तमाशाशी कोणाचा संबंधही नव्हता त्यांचे वडील गुजरात मधुन मुळगावी साताय्राला आले तेव्हा कांताबाई बालपणी मैत्रीणींसोबत नृत्य करायच्या साताय्रातील विविध मेळ्यातील नृत्याची त्या नक्कल करायच्या त्यातुनचं त्यांचा नृत्य आणी तमाशा कडे कल वाढला पुढे साताय्रातील सर्जेराव आहिरवाडीकर यांच्या तमाशात त्यांनी काम सुरू केलं बघता बघता कांताबाई सातारकर नाव गाजु लागलं.

शांताबाईंनी पुण्या-मंबईत हि तमाशा चे खेळ केले वयाच्या आकराव्या वर्षी आहिरवाडीकर यांच्या तमाशाच्या माध्यमातून तमाशा रंगभूमीवर पदार्पण यानंत्तर वगसम्राट बाबुराव पुणेकर यांच्या तमाशात काम करित या क्षेत्रातील त्यांनी असंख्य बारकावे अभ्यासले पण आयुष्यात जे करायचे ते भव्यदिव्य करायचे हे स्वप्न घेऊन 1953 च्या सुमारास एकटिने मुंबई गाठली पण फक्त एक दिवस दादु ईदुरीकर यांच्या तमाशात काम करून नंतर दुसय्राचं दिवशी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली येथुनच त्यांच्या कलाजिवणाला कलाटणी मिळाली कांताबाई आणी खेडकर या जोडीनं रायगडाची राणी आर्थात पन्हाळगडाचा नजरकैदी पाच तोफांची सलामी महारथी कर्ण हरिचंद्र तारामती जय विजय गवळ्याची रंभा आदी धार्मिक सामाजिक वगनाट्यात काम केलं तमाशात गाजलेली हि जोडी पुढे आयुष्यात हि एक झाली त्यांनी तुकाराम खेडकर यांच्याशी विवाह केला पुढे त्यांना अनिता अलका रघुविर व मंदाराणी अशी चार अपत्ये झाली मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थियेटरला जायचा 1964 मध्ये त्यांच्यावर मोठा अघात झाला येवला तालुक्यातील एका गावात तमाशा सुरू असताना अचानक तुकाराम खेडकर यांची तब्येत बिघडली त्यामुळे उपचारासाठी पुण्याला नेत असताना खेडकरांचे निधन झाले.

पती गेल्यानंतर त्या एकट्या पडल्या त्यांचं नशीब फिरलं एवढेच नव्हे तर त्यांना पतीच्याच तमाशातुन बाहेर पडावे लागले होते दोन वर्षापुर्वी तब्बल 70 वर्ष तमाशा कला क्षेत्रात मोठ योगदान दिल्याबद्दल त्यांना जिवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं संगमनेर मधील एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता या कार्यक्रमाला अनेक बडे नेते उपस्थित होते.

तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी राज्य सरकारने 2005 मध्ये त्यांना पहिला विठाबाई नारायणगावकर जिवण गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं दिल्लीतील राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणी रघुविर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला आहे मुंबई विद्यापीठाच्या आवारात तंबु ठोकून सिने नाट्यसृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमानही त्यांना मिळाला होता.

कांताबाई च्या तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब आज हि एकत्र राहुन तमाशा रंगभूमीची सेवा करित आहे त्यांचे चिरंजीव कलाभुषण रघुविर खेडकर मुली अनिता अलका मंदाराणी नातु मोहित व अभिजीत नातसुन आमृता नात पुजा जावई दिपकराव मेंगजी गोतान्बर सौन्दाडेकर राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे संतोष खेडलेकर यांणी कांताबाई सातारकर यांचे वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर या नावाने चरित्र लिहिले आहे .

हेही वाचा-वडशिवने येथील त्या शिपायाचा अपघात नसून घातपात; पहाटे मॉर्निग वॉकला येतो, हे लक्ष ठेऊन ‘त्याने’ केला गेम

करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद; चार दिव्यांगांना तीन चाकी सायकल चे वाटप

कांताबाई सातारकर यांचे गाजलेली वगनाट्य
रायगडाची राणी गवळ्याची रंभा गोविंदा गोपाळा 1857 चा दरोडा तडा गेलेला घडा अधुरे माझे स्वप्न राहिले कलंकिता मि धन्य झालो असे पुढारी आमचे वैरी डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी कोंढाण्यावर स्वारी पाच तोफांची सलामी महारथी कर्ण हरिचंद्र तारामती जय विजय
करमाळा माढा न्युज कडुन या जेष्ठ वगसम्राज्ञीस आखेरचा सलाम भावपुर्ण श्रध्दांजली

litsbros

Comment here