करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील ‘या’ तीन गावचा ग्रामदैवत यांचा यात्रा उत्सव रद्द

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘या’ तीन गावचा ग्रामदैवत यांचा यात्रा उत्सव रद्द

केतूर ( अभय माने) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामदैवत भैरवनाथ देवाचा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून परिसरातील केतुर, हिंगणी, वाशिम्बे येथील ग्रामदैवतांचा उत्सव पारंपरिक पद्धतीने ठराविक मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टेंस ठेवून व शासनाच्या वतीने सांगितलेले सर्व नियम व अटी व बंधने पाळत यात्रा कमिटीने साजरा केला.

केतूर (ता.करमाळा) येथे सकाळी भैरवनाथ मंदिरात माजी सरपंच उदयसिंह मोरेपाटील व त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी मोरे पाटील यांच्या हस्ते देवाच्या मूर्तीला अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली.

गतवर्षीही रोगाचा प्रादुर्भावामुळे यात्रा उत्सव रद्द करण्यात आला होता. प्रतिवर्षी देवाच्या देवाच्या घोड्याची मिरवणूक वाजत-गाजत बाधित गावातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात येते याबरोबरच करमणुकीचे कार्यक्रम तसेच मंदिरासमोर गुळ, शेरणी वाटपाचे वेळी भाविकांची मोठी गर्दी जमते कुस्त्यांचा आखाडा ही भरतो हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.


हेही वाचा-कोविड परिस्थितीत राज्यातील नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी किमान 10 टक्के बेड राखीव ठेवा.!

पांडे येथील ‘या’ पत्रकार मित्राने दिले टीटवी पक्षाला जीवदान

कोरोना महामारीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन भाविकांनी ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात न येता घरातूनच ग्रामदैवतेला नैवैद्य दाखवावेत असे आवाहन यात्रा कमिटीने केले होते ग्रामस्थांनीही या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मंदिरासमोर होणारी गर्दी टाळली.

litsbros

Comment here