तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा करमाळा ग्राहक पंचायतच्या वतीने सत्कार संपन्न

तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा करमाळा ग्राहक पंचायतच्या वतीने सत्कार संपन्न

करमाळा (प्रतिनिधी);
अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तालुक्याच्या वतीने करमाळा तहसीलदार म्हणून मा.शिल्पा ठोकडे मॅडम यांना पूर्ण वेळ पदस्थापणा मिळाले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी करमाळा तालुका ग्राहक पंचायत चे अध्यक्ष मा. ॲड शशिकांत नरुटे यांनी त्यांच्या बाबतीत पाठीमागे केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच कायदा पालनाच्या चळवळीत ग्राहक पंचायत अग्रस्थानी असते. आपणही ग्राहक पंचायत ला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

याबाबत प्रशासनालाही सहकार्य करा व येणाऱ्या काळात तालुक्यातील अनेक अनुत्तरीत प्रश्न सोडवण्यासाठी माझा प्रयत्न असेल असे मत मा. तहसीलदार मॅडम यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार मा. शैलेश निकम साहेब, अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे अध्यक्ष ॲड शशिकांत नरुटे, सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख मा. माधुरीताई परदेशी,

हेही वाचा – उमरडच्या शेतकऱ्यांना सदगुरु कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी दिले माती परीक्षणाचे धडे

लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवॉर्ड प्रदान; करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान

तालुका कार्यकारिणीतील सदस्या मा. निलिमा पुंडे मॅडम, मा. मंजिरी जोशी मॅडम, मा. रेखाताई परदेशी , कविता नाईक मॅडम पुढारीचे पत्रकार मा. अशपाक सय्यद, तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी मा. शिवाजी वीर मा. ब्रम्हदेव नलवडे मा. नितीन नलवडे मा. संभाजी कोळेकर मा. प्रा. ज्ञानेश्वर भुजबळ, मा. प्रा. राम अनारसे मा. पाठक काका, मा. रमेश पाटील इ. पदकधिकारी उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line