नेताजी सुभाष विद्यालय केतुर २ येथे स्वामी विवेकानंद क्रीडा सप्ताहाला सुरुवात
केत्तूर ( अभय माने) नेताजी सुभाष विद्यालय केतुर २ (ता.करमाळा) येथे प्राचार्य के एल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली,तसेच स्वामी विवेकानंद क्रीडा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
हेही वाचा – प्रा.राहुलकुमार चव्हाण जगदीशब्दाच्या राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्काराने सन्मानित.
हिवरे येथील तरुणाने वाढदिवसानिमित्त केला देहदानाचा संकल्प.. स्तुत्य उपक्रम
गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंच्या कार्याची माहिती भाषणातून दिली.तसेच स्वामी विवेकानंद,बापूजी,जिजाऊ,साविञीबाई फुले,अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेत काही विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य के एल जाधव यांनी केले,सुञसंचालन व आभार किशोर जाधवर सर यांनी मानले.यावेळी सर्व गुरूदेव कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.