सुट्टीतील मामाच्या गावची ओढ ओसरली

*सुट्टीतील मामाच्या गावची ओढ ओसरली*

 

केत्तूर ( अभय माने) कधी एकदा परीक्षा होतात आणि उन्हाळी सुट्ट्या लागतात. सुट्ट्या सुरू झाल्या आणि मामाचे गाव हे घट्ट समीकरण… मात्र काळाच्या ओघात आठवणीच राहिले असून, सुट्टीला पर्याय उपलब्ध असल्याने मामाच्या गावचा ओढा मात्र करपून गेला आहे त्यातच अभ्यासाचा वाढता ताण शिकवणी वर्ग अनेक प्रकारचे कोर्स याचा परिणामही सुट्टीच्या काळात झाला आहे.

काही वर्षांपूर्वी सुट्ट्या लागल्या की, मामाच गाव हे हमखास आकर्षण होते परंतु काळाच्या ओघात ही आकर्षणही मागे मागे पडत गेले ज्या ठिकाणी प्रेमाची मुक्त उधळण होत होती ते ठिकाण म्हणजे आजोळ मामाचे गाव. ही नवलाई आता मात्र कविते पुरतीच मर्यादित राहिली आहे. मामाच्या गावचा ओलावा मात्र संपला आहे हे खरे !

जीवनात सध्या लागलेली धावपळ, जबाबदारीची ओझे यामुळे बालपण मात्र करपून चालले आहे. स्वतःच्या कुटुंबाला या महागाईच्या काळात सांभाळत असताना इतरांची गर्दी कशाला तरी ? अशी आत्मकेंद्रीय मानसिकता वाढत असल्याने मामाची गाव मात्र बाजूला पडत आहे.

हेही वाचा – लोकसभा आचारसंहितेमुळे जत्रा यात्रातील मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ब्रेक, कलावंतांचे काय ?

‘जग बदलणारा बापमाणूस’ मराठी पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन; जगदीश ओहोळ यांच्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाची जगभर चर्चा !

बैलगाडीतून मामाच्या गावात हिंडणे पोहणे याला बच्चे कंपनी मुकली आहे. सुट्टीसाठी मामाच्या गावाकडे आल्यावर बैलगाडीतून रानोमाळ हिंडणे परंतु काळाच्या ओघात बैलगाड्याच्या जागी चारचाकी वाहने आली आहेत त्यामुळे झुक झुक झुक आगीनगाडी… धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊया … ही कविता मात्र पुस्तकातच राहिली आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line