क्राइमबार्शीसोलापूर जिल्हा

हृदयद्रावक! पहिल्या पत्नीने आत्महत्या केलेल्या विहिरीतच दुसऱ्या पत्निनेही आपल्या चिमुरड्यांना घेऊन केली आत्महत्या 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

हृदयद्रावक! पहिल्या पत्नीने आत्महत्या केलेल्या विहिरीतच दुसऱ्या पत्निनेही आपल्या चिमुरड्यांना घेऊन केली आत्महत्या

कुसळंब/सोलापूर : एका विवाहितेने पोटच्या दोन चिमुरड्यांना घेऊन स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. २०१७ मध्ये याच विहिरीत पहिल्या पत्नीने दोन चिमुरडींना घेऊन आत्महत्या केली होती.

रोहिणी ऊर्फ अनुराधा बाबासाहेब काशीद (वय २२), अनिष बाबासाहेब काशिद (वय दीड वर्ष) व अक्षरा बाबासाहेब काशीद (वय चार महिने) अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. विद्युत मोटारी लावून सायंकाळी चार वाजता तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

नोव्हेंबर २०१९ मध्ये बाबासाहेब काशीद यांनी खडकोणी येथील दिलीप शिंदे यांची मुलगी रोहिणी ऊर्फ अनुराधा हिच्याशी दुसरा विवाह केला. शुक्रवारी घटनेदिवशी पती बाबासाहेब हे कामानिमित्त तर सासरे प्रभाकर हे बार्शीला बँकेतून पगार आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, रोहिणी हिने सकाळी १० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास दोन चिमुरड्यांना घेऊन उडी घेऊन आत्महत्या केली.

कुसळंब येथील बाबासाहेब काशीद यांची पहिली पत्नी अनुराधा बाबासाहेब काशीद (वय २३) हिने आदिती काशीद (वय ५) व अक्षरा काशीद (वय ३) या दोन मुलींना स्वत:च्या कमरेला साडीने बांधून घेऊन २७ जुलै २०१७ रोजी स्वत:च्या शेतातील त्याच विहिरीत आत्महत्या केली होती.

तेव्हा जाचहाट व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

litsbros

Comment here